विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाची घोषणा; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या

The Vaccine War:  ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. आता द कश्मीर फाइल्स चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  ‘द वॅक्सीन वॉर’(The Vaccine War) असं या चित्रपटाचं नाव आहे. ट्वीट शेअर करुन विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची माहिती दिली. 

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाचं पोस्टर दिसत आहे. या पोस्टरला विवेक यांनी कॅप्शन दिलं, ‘सादर करत आहोत- ‘द वॅक्सीन वॉर’. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या.’

अनेक नेटकऱ्यांनी द वॉक्सीन वॉर या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हा एक सुपर डुपर हिट चित्रपट असेल. मी माझ्या मित्रांसोबत फर्स्ट डे फर्स्ट शो बघेन.’ अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली.

‘द कश्मीर फाइल्स’ 11 मार्च 2022  रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. लवकरच कश्मीर फाइल्स या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्ल्वी जोशी, चिन्मय मांडलेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :  'आदिल मला जोकर म्हणतो'; राखी सावंतचा पतीवर गंभीर आरोप

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

The Kashmir Files 2 : ‘द काश्मीर फाइल्स 2’ पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला; विवेक अग्निहोत्रीची माहिती

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …