‘आदिल मला जोकर म्हणतो’; राखी सावंतचा पतीवर गंभीर आरोप

Rakhi Sawant Adil Khan Wedding : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे आणि पती आदिल खानवर (Adil Khan) केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. राखीने तिचा पती आदिलवर फसवणूक केल्याचे आरोप जाहीरपणे केले आहेत. 

आदिल मला म्हणाला जोकर : राखी सावंत

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतच्या आयुष्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. राखी ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. पण शेवटच्या टप्प्यात ती बाहेर पडली. त्यानंतर लगेचच तिच्या आईचे निधन झाले. दरम्यान, आदिल खानसोबतच्या (Adil Khan) चर्चांमुळे राखीच्या आयुष्यात वेगळं वळण आलं आहे. आला राखीने तिची खिल्ली उडवणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

ई-टाइम्सने दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली, “तुम्ही माझी चेष्टा करणं थांबवायला हवं. माझ्या आईच्या निधनाला चार दिवस झाले नाहीत आणि तुम्ही माझी चेष्टा करायला सुरुवात केली आहे. लोकांना हे सगळं नाटक वाटत आहे. त्यामुळे ते माझी चेष्टा करत आहेत. आदिलदेखील काल माझी चेष्टा करत होता. तो म्हणाला की, “मी सेलिब्रिटी बनलोय आणि तू जोकर आहेस.”” 

हेही वाचा :  कियारा-सिद्धार्थचं पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न होणार

राखी सावंतचे आदिलवर गंभीर आरोप

राखी सावंत पुढे म्हणाली, “माझ्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत. या प्रकरणावर सर्वांसमोर बोलण्याची त्याने मला धमकी दिली आहे. जर मी याप्रकरणी सर्वांसमोर बोलले तर तो घटस्फोट देईल. माझा पती ज्या मुलीसोबत रिलेशनमध्ये आहे ती मला म्हणाली की, मी कोणाला घाबरत नाही”. 

राखी सावंतबद्दल जाणून घ्या…

राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखीनं काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीने आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.

बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. राखी तिच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rakhi Sawant : राखी सावंत मुंबई पोलिसांच्या ताब्यात; मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …