भारतात डिजिटल रुपयाची होणार सुरुवात? सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या

RBI Digital Rupee: भारतात जी 20 परिषद सुरु असून यामध्ये जगभरातील दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. यावेळी भारतातील प्रमुख पदांवर देशातील महत्वाचे बदल जगासमोर ठेवत आहेत. यूपीआयचा वापर हा एक त्यातीलच एक भाग आहे. असे असताना आता भारतात डिजिटल रुपया म्हणजेत ई रुपया येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाला पार्श्वभूमीदेखील तशीच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भारत प्रगतीपथावर असून देशात विविध विकास योजना राबविल्या जात आहेत.दरम्यान, देशात डिजिटल रुपयाबाबतही बरीच चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. यामुळे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये बदल झालेला दिसून येऊ शकतो. 

आरबीआय लवकरच डिजिटल रुपया पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऑक्टोबरपर्यंत आंतरबँक कर्ज किंवा कॉल मनी मार्केटमधील व्यवहारांसाठी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया बाजारात आणू शकते. सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. 

1 नोव्हेंबर 2022 रोजी होलसेल सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC)रोजी लाँच करण्यात आले. त्याचा वापर सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजारातील व्यवहारांच्या निपटारापुरता मर्यादित होता.”रिझर्व्ह बँक या महिन्यात किंवा पुढील महिन्यात कॉल मार्केटमध्ये घाऊक सीबीडीसीऑफर करेल, असे चौधरी यांनी जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेवेळी सांगितले. केद्राकडून याआधीदेखील याचा उल्लेख झाला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात CBDC लॉन्च करण्याची घोषणा केली होती. वित्त विधेयक,2022 मंजूर झाल्यामुळे RBI कायदा 1934 च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :  देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !

कोणत्या बॅंकामध्ये ई रुपी?

RBI ने घाऊक CBDC च्या पायलट प्रोजेक्टसाठी नऊ बँकांची निवड केली आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. तसेच देशातील प्रसिद्ध आणि मोठ्या बँकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे. डिजिटल रुपया खरेदी करण्यासाठी वरीलपैकी  कोणत्याही एका बँकेच्या वेबसाइटवर किंवा या बँकांच्या ॲपवर जाऊन ई रुपया वॉलेट वापरण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. सीबीडीसी किंवा ई-रुपया हे रिझर्व्ह बँकेने दिलेले सार्वभौम चलन आहे.

G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

तुम्हाला काय होणार फायदा?

डिजिटल रुपया हा मध्यवर्ती बँकेने बाजारात आणलेला आहे. त्यामुळे तो आभासी चलनाप्रमाणे बेभरवशी नाही.गरज भासल्यास ई-रुपया  प्रत्यक्ष रुपयात सहजगत्या रूपांतरित करता येतो. हे एक लवचीक चलन आहे. ही करन्सी फाडून टाकता येत नाही. त्याचे आगीसारख्या संकटातून बचाव होतो. तुम्हाला ई-रुपयाला दुसऱ्या कोणत्याही ई-चलनासमोर बदलता येत नाही.

हेही वाचा :  Video : जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेरात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …