पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधापेक्षाही भयंकर आहे फिशर, हे 5 उपाय आरामाचं गुपित

बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर आणि भगंदर ही नावे तुम्ही कधी ना कधी ऐकली किंवा वाचली असतीलच. यापैकी अनेकांना बद्धकोष्ठता आणि मूळव्याध याबद्दल माहिती आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का फिशर म्हणजे काय आणि याचा उल्लेख नेहमी बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध यासोबत का केला जातो? फिशर हे खरे तर गुदद्वाराच्या किंवा फिशर अॅनलच्या आत लहान लहान उती अर्थात टिश्यूज असतात, जे गुदद्वाराच्या नलिकेमध्ये असतात. जेव्हा गुदद्वाराच्या नलिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा कट किंवा क्रॅक तयार होतो, तेव्हा त्याला गुदद्वारासंबंधीचा फिशर रोग म्हणतात.

हा आजार एक प्रकारे मूळव्याध रोगासारखाच आहे, मूळव्याधाच्या आजारामध्ये फोड शौचाच्या जागेच्या आत किंवा बाहेर तयार होतात आणि त्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो परंतु फिशरमध्ये गुदद्वाराची नलिका कापली जाते किंवा तिला भेगा पडतात. ही गोष्ट संडास करतेवेळी किंवा कडक संडास बाहेर पडताना होऊ शकते. असे झाल्यास तुम्हाला मूळव्याधाप्रमाणेच संडास करताना वेदना होऊ शकतात किंवा रक्तस्राव होऊ शकतो.

हेही वाचा :  Video : पाणी नसल्याने बैलांना वॉशिंग सेंटरवर नेण्याची वेळ; नाशिकच्या निम्म्या भागावर दुष्काळाचे सावट

फिशरची कारणे व उपाय काय आहेत?

आयुर्वेद डॉक्टर मिहिर खत्री यांचे मत आहे की, हा आजार बद्धकोष्ठतेमुळे होतो आणि म्हणूनच बद्धकोष्ठता टाळण्यासाठी किंवा आराम मिळण्यासाठी त्याच्यावर मुळापासून उपचार करणे आवश्यक आहे. मेडिकलमध्ये यासाठी अनेक औषधे आहेत, परंतु तुम्ही तुमच्या आहारात बदल करून या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. चला जाणून घेऊया की या स्थितीत तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

(वाचा :- Covid 4th Wave : भारतात जानेवारीला येणार करोनाची चौथी लाट? AIIMS डॉक्टरांचा सल्ला, पुढील 40 दिवस करा हे एक काम)

योग्य उपाय आहे पपई

पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते जे पचन सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गुदद्वाराच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळतो. पपईचे सेवन केल्याने अस्वस्थता कमी होते आणि आतड्याची हालचाल सुरळीत होते. तुम्ही मिड-मॉर्निंग स्नॅक्स किंवा सॅलड म्हणून पपईचे सेवन करू शकता.

(वाचा :- सावधान..! कितीही भयंकर खोकला येऊदेत, पण हे नाव असलेलं Cough Syrup चुकूनही पिऊ नका, आतापर्यंत 18 लोकांचा मृत्यू)

काळे मनुके सुद्धा आहेत फायदेशीर

काळे मनुके हे डायटरी फायबरने समृद्ध असतात. 20-30 मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी प्रथम ते खा आणि मग मनुके ज्यात भिजवत ठेवलेले ते पाणी प्या. यामुळे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास आणि आतड्यांचे शारीरिक कार्य सुरळीत होण्यास मदत मिळेल.

हेही वाचा :  पोट साफ न होणं, भयंकर मुळव्याध 100% बरा करतात या 15 भाज्या,खेचून बाहेर फेकतात आतड्यातील घाण

(वाचा :- गुडघ्यांच्या वेदनांतून मिळेल एका मिनिटात मुक्ती, या 7 घरगुती गोष्टी औषधापेक्षाही रामबाण, त्रास होतो कायमचा दूर)

व्हेजिटेबल सूप

व्हेजिटेबल सूप हा एक अत्यंत प्रसिद्ध होत असणारा पदार्थ आहे. कारण लोकांना आता याचे महत्त्व कळू लागले आहे आणि म्हणूनच व्हेजिटेबल सूपला खूप मागणी सुद्धा आहे. रात्रीच्या जेवणात जर तुम्ही व्हेजिटेबल सूप खाल्ले तर अतिउत्तम! भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारते, आतड्याची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

(वाचा :- Health Tips: फ्रिजमध्ये चुकूनही ठेऊ नका हे 4 पदार्थ, विषारी बनून पोट व आतड्यांना टाकतात पूर्ण जाळून, व्हा सावध)

दुधात देशी तूप टाकून प्या

जर तुम्हाला बद्धकोष्ठता, मूळव्याध किंवा फिशर सारख्या गंभीर समस्यांशी सामना करावा लागत असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात एक चमचा देशी तूप मिसळून प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला मल मऊ होतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

(वाचा :- Immunity Booster : शरीर आतून पोखरून टाकतोय Corona व थंडीचा प्रकोप, वाचण्यासाठी या 5 पद्धतींनी वाढवा इम्युनिटी)

ही गोष्ट लक्षात ठेवा

डॉक्टर मिहिर खत्री सल्ला देतात की, जर तुम्हाला वरील उपायांनी आराम मिळत नसेल आणि रक्तस्त्राव सतत होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेट द्या जेणेकरून मूळ कारणावर योग्य उपचार करता येतील.

हेही वाचा :  पोट साफ न होणं व बद्धकोष्ठतेची समस्या झटक्यात होणार दूर

(वाचा :- रोज खाल्ल्या जाणा-या या 1 पदार्थात ठासून भरलंय रक्ताच्या नसा ब्लॉक करणारं कोलेस्ट्रॉल, यामुळेच येतो हार्ट अटॅक)

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

एनल फिशर या भयंकर आजारावर आयुर्वेदिक उपाय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …