पोट साफ न होणं व बद्धकोष्ठतेची समस्या झटक्यात होणार दूर

Constipation Home Remedies : बदललेली जीवनशैलीचा परिणाम खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होतो. अनेकदा लोक या गोष्टीला गाभिर्यांने घेत नाहीत. पण या गोष्टीवर वेळीच उपचार केले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. यामुळे मूळव्याध (Piles) आणि गंभीर प्रकरणांमध्ये गुदद्वाराच्या कर्करोगाचा (Anal cancer) धोका वाढू शकतो.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, दिनचर्येतील बदल किंवा फायबरचे कमी सेवन यामुळे अनेकदा बद्धकोष्ठता निर्माण होते असे तज्ज्ञांचे मत आहे. जर तुम्हाला देखील अशा समस्या येत असतील तर सतर्क राहून योग्यवेळीस तुम्ही डॉक्टरकडे जाणून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. यासाठीच डॉक्टर न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी काही उपाय सांगितले आहेत. (फोटो सौजन्य :- @Istock)

चमत्मकारी मनुके

चमत्मकारी मनुके

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मनुका सेवन हा सर्वोत्तम आणि प्रभावी उपाय आहे. मनुकामध्ये सॉर्बिटोल असते त्यामुळे अन्न पचवण्यास मदत होते. हे आतड्यांमध्ये पाणी काढून, मल त्यागास चालना देते. यामुळे बद्धकोष्ठता कमी करण्यात मदत होते.

​बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय..!

हेही वाचा :  Covid 4th wave symptoms : करोनाच्या चौथ्या लाटेने कसली कंबर, पहिला ताप नंतर खोकला आणि मग दिसतात ‘ही’ 4 गंभीर लक्षणे!

भाज्यांचे ज्यूस

भाज्यांचे ज्यूस

नाश्त्या नंतर आणि दुपारच्या जेवणापूर्वी किंवा संध्याकाळी तुमच्या आवडत्या भाज्यांपैकी कोणत्याही भाजीचा एक ग्लास ज्यूस पिणे आरोग्यासाठी खूपच फायदे होतो. यासाठी तुम्ही पालक + टोमॅटो + बीटरूट + लिंबाचा रस + आले मिक्स करून ताजा रस बनवू शकता. याचा फायदा तुमच्या त्वचेला देखील होऊ शकतो.

त्रिफळा

त्रिफळा

आयुर्वेदात त्रिफळाला खूपच महत्त्व देण्यात आले आहे. ही एक अप्रतिम औषधी वनस्पती आहे. त्रिफळाच्या मिश्रणात आमलाकी (आवळा), हरितकी (हरड) आणि बिभिताकी (बहेडा) या तीन महत्त्वाच्या औषधी वनस्पती आहेत. त्या सर्व बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. झोपण्यापूर्वी अर्धा चमचा एक कप कोमट दूध किंवा कोमट पाण्यात त्रिफळा घ्या यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

(वाचा :- आता बिनधास्त खा रबडी-जिलेबी! या भयंकर आजारापासून मिळेल कायमची सुटका, फक्त डॉक्टरांनी सांगितलेली वेळेतच खा)​

ओट्स​

ओट्स​

ओट्समध्ये बीटा-ग्लुकन्स भरपूर प्रमाणात असतात. हे एक प्रकारचे फायबर आहे, जे पोटाच्या कार्यास प्रोत्साहन देते. हे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास देखील मदत करते, जे आतड्यांच्या कार्यास चालना देण्यास तसेच त्यांत आरोग्यदायी सुधारण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेवर आराम मिळण्यास मदत होते.

हेही वाचा :  VIDEO: मंगळ ग्रहावर कधी 'वादळ' पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

(वाचा :- वयाच्या 80 व्या वर्षांत Amitabh Bachchan यांना शूटिंगदरम्यान दुखापत, ‘महानायकाला’ आतापर्यंत झाले हे गंभीर आजार) ​

तूप

तूप

साजुक तुपातील ब्युटायरेट घटकाचा बद्धकोष्ठतेसाठी फायदा होतो. तुपाचा तेलकट पोत चिकट तेलाच्या स्वरूपात काम करतो यामुळे मलाचा कडकपणा कमी होण्यास मदत होईल. आहारात नियमितपणे तुपाचा समावेश केल्यास शौचास सुलभ होण्यास मदत होईल. या गोष्टीचा फायदा तुमच्या त्वचेसाठी देखील होऊ शकतो.

(वाचा :- Ways to Reduce Uric Acid stones: ना औषध, ना कसला त्रास फक्त या 5 गोष्टी करा, युरीक अ‍ॅसिड झटक्यात बाहेर पडेल) ​

(टिप :- हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …