Optical Illusion Image: लोकं तुमच्याबद्दल काय विचार करतात? फोटो पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!

Optical Illusion IQ Test: ऑप्टिकल इल्यूजन (optical illusions) एक असा खेळ आहे ज्यामुळे आपल्या बुद्धिला चालना मिळते. या गेममध्ये वेगवेगळ्या वस्तू किंवा व्यक्ती शोधण्याचं आव्हान दिलं जातं. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे असतात. जे पाहून तुमचेही डोळे चक्रावून जातील. अशातच एका फोटोने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

आर्टिस्ट ओलेग शुप्लियाक यांचा एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो इंटरनेटवर चर्चेत आहे. ओलेग शुप्लियाक हे युक्रेनियन कलाकार आहेत. लोक तुम्हाला पहिल्यांदा पाहतात तेव्हा तुमच्याबद्दल काय विचार करतात, याची प्रचिती देणारी ही पेटिंग सध्या चर्चेत आहे. तुम्हाला हा फोटो पाहून काय वाटतं? थोडं निरीक्षण करा आणि नंतर पुढची बातमी वाचा…

जर तुम्ही या फोटोमध्ये पहिल्यांदाच घोडा पाहिला तर तुमच्या आय कॉन्टॅक्टसाठी लोकं तुम्हाला लक्षात ठेवतील. समोरील व्यक्तीच्या डोळ्यात बघून तुम्ही चांगले बोलता. याचा परिणाम घट्ट नाते निर्माण करण्यात होतो, असं लोकांना वाटतं.

जर तुम्हाला या फोटोमध्ये प्रथम एक संगीतकार दिसला, तर लोक तुम्हाला तुमच्या विनोदबुद्धीसाठी ओळखतील. जगाकडे पाहण्याचा तुमचा वेगळा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. लोकांना तुमच्याकडे आकर्षित करता, त्याचा तुमच्यावर वेगळा परिणाम दिसतो.

हेही वाचा :  Number Puzzle : 'या' फोटोत लपलेला उलटा 5 शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

आणखी वाचा – Optical illusion: फोटोमध्ये लपलीये एक महिला; फक्त 10 सेकंदाचा वेळ, शोधून दाखवा!

जर तुम्हाला या फोटोमध्ये प्रथम एक मोठं डोकं दिसलं असेल तर लोकं तुम्हाला साधी व्यक्ती समजतात. तुम्ही अगदी त्यांच्यासारखे असतात, असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते तुमच्याशी सहजरित्या मन मोकळं करू शकतात. तुमची मैत्री देखील तितकीच घट्ट असते, असं मानलं जातं.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …