Google ने Play Store वरुन काढून टाकलेले ‘हे’ Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट

Phone Apps: गुगल प्ले स्टोअर (google Play Store) एक अशी जागा बनली आहे जिथे बनावट ॲप्सचा पूर आला आहे. बनावट ॲप्सद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी  गुगल प्ले स्टोअर वरून सुरक्षितेसाठी धोकादायत अॅप्स काढण्यात आले आहे. जर हे अॅप्स तुमच्या मोबाईल मध्ये पण असतील तर तातडीने डिलीट करा.  हे अॅप्स स्मार्टफोनची (smartphone buttery) बॅटरी आणि सामान्यपेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरत होते. तुम्हीही खाली नमूद केलेले अॅप वापरत असल्यास, ते तुमच्या फोनवरून ताबडतोब अनइंस्टॉल करा.

Android स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अ‍ॅप्स डाउनलोड करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे Google Play Store. चिंतेची बाब म्हणजे गुगल प्ले स्टोअर पूर्णपणे सुरक्षित नाही आणि त्यावरील अनेक अ‍ॅप्समध्ये मालवेअरसारखे धोकेही येतात. आता यूजर्सना चार धोकादायक अ‍ॅप्स तात्काळ डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे. या दरम्यान अशा काही अ‍ॅप्सची माहिती समोर आली आहे, जे यूजर्सचा संवेदनशील डेटा चोरत आहेत आणि सुरक्षा रिसर्चर्सनी त्यांना त्वरित हटवण्याचा सल्ला दिला आहे.

मालवेअर अ‍ॅप्समध्ये Android ट्रोजन्स

Malwarebytes Labs मधील सुरक्षा संशोधकांनी अशा चार Android अ‍ॅप्स रिपोर्ट केले आहेत जे Google Play Store वर होते आणि त्यांच्या मदतीने Android ट्रोजन डिव्हाइसेसवर वितरित केले जात होते. ‘Android/Trojan.HiddenAds.BTGTHB’ ट्रोजन असलेले हे अ‍ॅप्स लाखो वेळा डाउनलोड केले गेले आहेत आणि सर्व एकाच अॅप डेव्हलपर मोबाइल अ‍ॅप्स ग्रुप (Mobile Apps Group) ने विकसित केले आहेत. 

हेही वाचा :  “सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी…”; अमोल कोल्हेंनी कविता शेअर करत दिला नवाब मलिकांना पाठिंबा

वाचा : Pen बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने लावला बँकांना 750 कोटींचा चुना  

मालवेअर असलेले अ‍ॅप्स छुप्या पद्धतीने जाहिराती दाखवत होते आणि वापरकर्त्यांना त्यावर टॅप करवून घेतले जात होते. या जाहिराती दाखवण्यासाठी वापरकर्त्यांच्या डेटाची मदत घेण्यात आली आणि त्यांच्या आधी घेतलेल्या परवानग्यांच्या मदतीने हा डेटा गोळा करण्यात आला. हेच कारण आहे की Play Store वरून अॅप्स डाउनलोड करताना तुमची रिव्ह्यू आणि रेटिंग तपासणे खूप महत्वाचे आहे.  

हे Apps ताबडतोब हटवा

– Bluetooth Auto Connect

– Driver: Bluetooth, Wi-Fi, USB

– Bluetooth App Sender

– Mobile Transfer: Smart Switch



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?

First Video Call : आताच जग हे इंटरनेटचं जाळ आहे. इथे प्रत्येक व्यक्तीच्या मग तो …

WhatsApp ने दिले मोठे अपडेट; नवीन फिचर केले लाँच; Zuckerberg दिली माहिती

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅप हे आजच्या पिढीसाठी खूप गरजेचे झाले आहे. ऑफिसच्या कामांसाठी ते पर्सनल चॅटिंगसाठीहे …