फोटोतील ‘या’ क्युट मुलीला ओळखलंत का?

Celebs Childhood Pics: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ‘आपले आवडते कलाकार त्यांच्या बालपणी कसे दिसत असतील?’, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो.  नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या अभिनेत्रीनं गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan)  यांच्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल…

अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karisma Kapoor)  हा बालपणीचा फोटो आहे. करिश्मानं तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं होतं, ‘अॅन अॅप्पल अ डे किप डॉक्टर्स अवे’ करिश्माचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


news reels New Reels

सलमान आणि गोविंदाच्या हिट चित्रपटांमध्ये केलं काम
राजा बाबू, कुली नंबर 1, हिरो नंबर 1 या हिट चित्रपटांमध्ये करिश्मानं गोविंदासोबत काम केलं. तर सलमान खानसोबत करिश्मानं बीवी नंबर वन, जुडवा, अंदाज अपना अपना, हम साथ साथ है आणि दुल्हम हम ले जायेंगे या चित्रपटांमध्ये काम केलं.  दिल तो पागल है, रिश्ते या करिश्माच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  


वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत

हेही वाचा :  Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आणि शिझान खानचा ब्रेकअप कसा झाला?

करिश्मा कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर 2016 मध्ये संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला.

करिश्माचे आगामी प्रोजेक्ट

करिश्मा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे. ब्राउन हा चित्रपट आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही.  अभय देव हा ब्राउन नावाच्या या नव्या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहे. ,  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Karisma Kapoor : ‘पुन्हा लग्न करणार का?’; चाहत्याच्या प्रश्नाला करिश्मानं दिलेल्या उत्तरानं वेधलं अनेकांचं लक्ष



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …