फोटोग्राफरवर भडकल्या जया बच्चन; म्हणाल्या…

Jaya Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी काल (17 जानेवारी) इंदूरच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे वर्च्युअली उपस्थित होते. नुकताच जया बच्चन यांचा इंदूर विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकल्या आहे, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 
 
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, इंदूर विमानतळावर जया बच्चन यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न एक फोटोग्राफर करत आहे. यावेळी जया बच्चन या फोटोग्राफरवर भडकल्या. जया बच्चन या त्या फोटोग्राफरला म्हणतात, ‘प्लीज माझा फोटो काढू नका’ नंतर त्या म्हणतात, ‘तुला इंग्रजी येत नाही का?’ ,’अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकलं पाहिजे’, असंही जया बच्चन म्हणतात. या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओला कमेंट करुन अनेक लोक जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

एका नेटकऱ्याने जया बच्चन यांच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट केली, ‘त्यांचा फोटो तुम्ही का काढता?’ तर ‘त्यांच्या मुलांना बॉयकॉट करा’ ‘त्यांना पब्लिसिटी देऊ नका’, अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली आहे. 

हेही वाचा :  Riteish Deshmukh : रितेश देशमुख एमएक्स टकाटकवर करणार बॉलिवूड-स्टाईल एन्ट्री

पाहा व्हायरल व्हिडीओ : 


news reels New Reels

जया बच्चन या विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये आलेले फोटोग्राफर्स त्यांचे फोटो काढतात पण अनेक वेळा जया बच्चन या फोटोग्राफर्सवर ओरडत असतात. याआधी दिवाळीला बच्चन कुटुंबाचं दिवाळी सेलिब्रेशन कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी काही फोटोग्राफर्स अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या बाहेर आले होते. यावेळी जया बच्चन यांनी घराबाहेर येऊन फोटोग्राफर्सला खडे बोल सुनावले होते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Kaun Banega Crorepati : संसाराच्या 50 वर्षानंतर Amitabh Bachchan यांनी सांगितलं Jaya Bachchan सोबत लग्न केल्याचं कारण; केबीसीच्या मंचावर खुलासा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …