कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिलात? सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

Quotation Gang Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) यांच्या कोटेशन गँग (Quotation Gang) या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील. कोटेशन गँगच्या ट्रेलरमधील डायलॉग्सना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की या चित्रपटाचे कथानक गँगवॉरवर आधारित आहे.

ट्रेलरमध्ये सनी लिओनीचा ‘एक गँग लीडर ही दूसरे गँग लीडर को मार सकता है’ हा डायलॉग ऐकू येतो. तसेच ट्रेलरमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्स बघायला मिळतो. तसेच चित्रपटात जॅकी श्रॉफ यांचा हटके अंदाज देखील पाहायला मिळेल. क्राईम-थ्रिलर चित्रपट कोटेशन गँगच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या ट्रेलरमध्ये फॅमिली मॅन फेम अभिनेत्री प्रियामणीची झलक देखील बघायला मिळत आहे.  हा चित्रपट मुंबई, काश्मीर आणि चेन्नईमध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या गँग्सच्या कथेवर आधारित आहे. 

सनी लिओनीने शेअर केला ट्रेलर

सनी लिओनीने कोटेशन गँग या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करुन तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “कोटेशन गँगच्या जगात आपले स्वागत आहे” सनीने शेअर केलेल्या या ट्रेलरला अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 

हेही वाचा :  'पोलिसांनी एवढं धुतलं की...'; आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

पाहा ट्रेलर

news reels New Reels


हिंदीमध्ये रिलीज होणार कोटेशन गँग

‘कोटेशन गँग’चे दिग्दर्शन विवेक कुमार कन्नन यांनी केले आहे. ते या चित्रपटाचे निर्माते देखील आहेत. हा तमिळबरोबरच हिंदी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. जॅकी श्रॉफ हे काही महिन्यांपूर्वी ‘फोन भूत’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या चित्रपटात त्यांनी कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. जॅकी श्रॉफ आणि सनी लिओनी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Celebs Childhood Pics: फोटोतील ‘या’ क्युट मुलीला ओळखलंत का? गोविंदा आणि सलमानसोबत दिलेत हिट चित्रपट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …