देव तारी त्याला कोण मारी! डब्यात चढताना महिला मुलांसह रुळावर पडली, त्यानंतर जे काही झालं..

Shocking Viral Video : देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर बिहारमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक महिला आणि 2 मुलं चालत्या रेल्वेखाली अडकल्याचं पहायला मिळतंय. हायस्पीड ट्रेनचा सामना तिघांनी कसा केला? याचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे. पण हे तिघं अडकले कसे? पाहुया…

नेमकं काय झालं?

बिहारमधील पटना येथील बरह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर अपघात झाल्याचं दिसून आलंय. विक्रमशिला ट्रेनमध्ये चढत असताना गोंधळ उडाला. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांसह रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी गडबड झाली अन् आई आणि दोन्ही मुलं रुळावर पडले. मात्र, त्यांना बाहेर निघता येत नव्हतं. त्यावेळी रेल्वेचा भोंगा वाजला अन् आरडाओरड सुरू झाली. लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे सुरू झाल्याने त्यांना काहीच करता आलं नाही. रेल्वेने वेग पकडला अन् खाली तिघंही अडकलेले होते. हा सर्व प्रकार पाहत असलेल्या लोकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. 

हेही वाचा :  viral snake video : कोब्रा सापाने केली शाम्पूने अंघोळ..Video पाहून येईल अंगावर काटा

आईने आपल्या दोन्ही मुलांना छातीशी घट्ट मिठी मारली आणि डोकं टेकवून जमिनीवर बसून राहिली. रेल्वे गेल्यानंतर (Train Passes Over Woman) पोलिसांनी धाव घेत तिघांना बाहेर काढलंय. महिला आपल्या दोन मुलांसह ट्रेनखाली अडीच मिनिटे डोके टेकवून बसून राहिली. त्यानंतर आता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.  

पाहा Video

पोलिसांनी काय सांगितलं?

गुसरायचे रहिवासी रवी कुमार आपली पत्नी आणि दोन मुलांसह दिल्लीला जाण्यासाठी विक्रमशिला एक्स्प्रेसच्या 8 क्रमांकाच्या कोचने बरह स्टेशनवर पोहोचले होते. विक्रमशीला एक्स्प्रेस येताच रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रेल्वे प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यावेळी गोंधळ उडाल्याने हा सर्व प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …