ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया

Elon Musk Reaction: आपण अनेकवेळा लांब पल्ल्याच्या ट्रेनने (Long Route Train) प्रवास करतो. काही वेळा हा प्रवास काही तासांचा असतो तर अनेक वेळा हा प्रवास काही दिवसांचाही असतो. या प्रवासात आपल्याला सुंदर निसर्गाचं (Nature) दर्शन घडतं, दऱ्या-खोऱ्या, डोंगर, पर्वतरांगा, गाव, शहरं पाहिला मिळतात. पण रात्रीच्या प्रवासात आपल्या आजूबाजूला असतो तो केवळ मिट्ट काळोख. कितीही डोळे मोठ्ठे केले तरी धावत्या ट्रेनच्या बाहेरचं दृश्य आपल्याला पाहात येत नाही. अशावेळी आपण कधी विचार केला आहे का? आपण ज्या ट्रेनमध्ये बसलो आहे त्या ट्रेनच्या मोटरमनला (Motorman) रात्री ट्रेनच्या लाईटच्या उजेडात बाहेरचं दृश्य कसं दिसतं. 

हेच दाखवण्यासाठी एका युजरने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, तो वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लाखो युजर्सने पाहिला आहे, पण महत्त्वाचं म्हणजे अब्जाधीश एलन मस्क (Elon Musk) यांना ही या व्हिडिओने आकर्षित केलं आहे. त्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. एलन मस्क यांच्या मालिकच्या ट्विटरवर ‘Wow Terrifying’नाव्याच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आहे. यावर प्रतिक्रिया देताना एलन मस्क यांनी ‘ट्रेन डायव्हर्स व्ह्यू अॅट नाईट’  असं कॅप्शन दिलं आहे. 

हेही वाचा :  Crime News: valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच...

व्हिडिओत ट्रेनमधून मोटरमनच्या सीटच्या समोरचं दृश्य दिसत आहे. ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला रेल्वेचे रुळ आणि रुळाच्या आसपासचं दृश्य दिसतंय. हे दृश्य जीतकं आकर्षक तितंच भयानकही दिसत आहे. या व्हिडिओवर लाखो लोकांनी पाहिला आहे, तसंच यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण अब्जाधीश एलन मस्क यांच्या प्रतिक्रियेनंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओला लाखोंनी कमेंट्स मिळाल्या आहेत. 

देशातील सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असून देशभरात रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणावर विस्तारलं आहे. काही रेल्वे गाड्या तर तीन ते चार दिवस सलग धावतात. भारतात सर्वात सर्वात लांबीचा रेल्वे मार्ग हा दिब्रुगड ते कन्याकुमारी हा आहे. हे अंतर जवळपास 4189 किलोमीटर इतकं असून हे अंतर कापायला तब्बल 74 तास 35 मिनिटं लागतात. नोव्हेंबर 2011 मध्ये हा रेल्वेमार्ग सुरु झाला, शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये हा रेल्वे मार्गाचं दर्शन घडलं होतं. 

त्यानंतर वैष्णोदेवी कटरा ते कन्याकुमार दरम्यान धावणारी हिमसागर एक्स्प्रेस ही तब्बल 3785 किमी अंतर कापते. ही साप्ताहित एक्स्प्रेस असून 12 राज्य ओलांडते. हे अंतर कापण्यासाठी तब्बल 73 तास लागता.  तर आगरताळा ते बंगळुरु कॅन्टामेंट दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसला 64 तास लागता. ही एक्स्प्रेस 3750 किमी अंतर कापते.

हेही वाचा :  लग्न म्हणजे काय? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात, म्हणाले 'तू जरा..'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …