Railway station : ही रेल्वे स्टेशन होणार चकाचक आणि लूकही बदलणार, यादी करा चेक?

Indian Railway : भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 19 रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार आहे. ( Railway station) रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईतील स्थानकांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील दादरसह 7 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. (Mumbai Railway Stations Set For Makeover) तर राज्यातील पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख रेल्वे स्थानकांचाही कायापालट होणार आहे.

Indian Railway: रेल्वेच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा का असतात, त्याचा अर्थ काय?

भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत.  मुंबई सेंट्रल, ठाणे, नागपूर, अजनी, जालना  आणि  औरंगाबाद रेल्वेस्थानके यापूर्वीच मेजर अपग्रेडेशन ऑफ स्टेशन्स पुनर्विकासासाठी हाती घेतली गेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कॅबिनेट कमिटीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे.

या स्थानकांचा होणार कायापालट

मुंबईतील अंधेरी, बांद्रा टर्मिनस,  बोरिवली, दादर, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस यांचा समावेश आहे. तर पुणे, लोणावळा,  मिरज, भुसावळ, नांदेड, नाशिक रोड, साईनगर शिर्डी, शिवाजीनगर पुणे, ठाकुर्ली, अमरावती, अकोला, वर्धा रेल्वेस्थानकांचा पुनर्विकासासाठी अभ्यास करण्यात येणार आहे. 

हेही वाचा :  स्वप्नांच्या पलीकडे! आईला वाटायचं पोरगं BDO व्हावं, पण UPSC चा निकाल लागला अन्...

राज्यातील 108 रेल्वेस्थानकांचा समावेश

राज्यातील 108 रेल्वेस्थानकांचा यापूर्वीच आदर्श स्थानकांच्या योजनेत विकास करण्यात आलेला आहे. देशभरात आदर्श रेल्वे स्थानक योजनेत 1552 स्थानकांची निवड करण्यात आली.  त्यापैकी 1218 स्थानकांचा विकास करण्यात आला आहे. उर्वरित स्थानकांचा जून 2023 पर्यंत विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांचा कायपालट करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या ग्राहक सुविधा योजनेत महाराष्ट्राला रेल्वेकडून मोठा वाटा मिळाला आहे. चार वर्षांत 2494 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : मतदान करा अन् बिअर, कॅब राईड मोफत मिळवा; कधीपर्यंत वॅलिड आहेत या ऑफर?

Loksabha Election 2024 : देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणुकीच्या पर्वाला सुरुवात झाली असून देशातील सरकार …

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …