जन्मल्यानंतर लगेचच करा या टेस्ट, आयुष्यभर बाळ राहील हेल्दी, दुर्लभ आजारापासून होईल सुरक्षा

जन्मानंतर लगेचच, नवजात बाळ निरोगी आहे की नाही हे तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. त्यात रक्ताच्या चाचण्यांचा समावेश होतो. जरी बाळ निरोगी दिसत असले तरी, नवजात स्क्रीन रक्त तपासणी बाळाला काही दुर्मिळ अनुवांशिक, हार्मोनल किंवा चयापचय विकार आहे की नाही हे ओळखू शकते.
Nationwidechildrens.org नुसार, हे विकार लवकर ओळखले नाहीत तर बाळाला गंभीर आरोग्य समस्या येऊ शकतात किंवा मृत्यूही होऊ शकतो. यातील बहुतेक विकार अनुवांशिक असतात आणि मुलाला ते त्यांच्या पालकांकडून वारशाने मिळतात. त्याचे निदान करण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. ज्यामध्ये फॉलो-अप चाचणी देखील येते. (फोटो सौजन्य – iStock)

कधी करावी ही टेस्ट

कधी करावी ही टेस्ट

बाळाच्या रक्ताचा नमुना प्रसूतीच्या 24 ते 48 तासांनंतर आणि पाचव्या दिवसापूर्वी घेणे आवश्यक आहे. बाळ घरी जाण्यापूर्वी या चाचण्या केल्या जातात. जर जन्मानंतर पहिल्या 24 तासांत चाचणी केली गेली, तर त्याची पाठपुरावा चाचणी पाच दिवसांत केली जाईल. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही विकारांबद्दल सांगत आहोत ज्यासाठी नवजात मुलांची स्क्रीनिंग टेस्ट केली जाते.

हेही वाचा :  Ajit Pawar Net Worth : संपत्तीच्या बाबतीत अजित पवारच 'दादा', शरद पवार यांची नेट वर्थ किती?

(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)​

बायोटिनिडेस डेफिशिएंसी

बायोटिनिडेस डेफिशिएंसी

stanfordchildrens.org च्या मते, हा अनुवांशिक विकार बायोटिनिडेस एन्झाइमच्या कमतरतेमुळे होतो. बायोटिनचे चयापचय करण्यासाठी हे एन्झाइम आवश्यक आहे. याशिवाय जन्मजात अ‍ॅड्रेनल हायपरप्लासिया नावाचा विकार शोधण्यासाठी रक्त तपासणीही केली जाते. या विकाराने ग्रस्त बाळांना कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन तयार करता येत नाही. हा हार्मोन एनर्जी, शुगर लेव्हल, बीपी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

(वाचा – ‘तो’ आईपण अनुभवणार, भारतातील पहिल्या ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमध्ये ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News)​

अमीनो ऍसिड डिसऑर्डर

अमीनो ऍसिड डिसऑर्डर

Nationalwidechildrens.org नुसारअन्नामध्ये अमीनो ऍसिड असतात. हे प्रथिनांसाठी बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करते. या विकारांमध्ये, शरीर उर्जेसाठी प्रथिनांचे अमीनो ऍसिडमध्ये विघटन करू शकत नाही. जन्मानंतर, यामुळे बाळाच्या मेंदू आणि इतर अवयवांना नुकसान होऊ शकते.

सिस्टिक फायब्रोसिस

सिस्टिक फायब्रोसिस

नॅशनल हेल्थ सर्विसनुसार, बाळाची सिस्टिक फायब्रोसिससाठी देखील तपासणी केली जाते. त्याचा पचन आणि फुफ्फुसावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये मुलाचे वजन योग्यरित्या वाढत नाही आणि त्याला छातीत संसर्ग होण्याची भीती असते. उच्च ऊर्जा आहार, औषधे आणि फिजिओथेरपीने लवकर उपचार केले जाऊ शकतात, अन्यथा मूल खूप आजारी पडू शकते.

हेही वाचा :  लग्न केल्याचा आयुष्यभर होईल पश्चाताप आणि मॅरिड लाईफ होईल पार बरबाद, जर या 4 गोष्टींवर वेळीच दिलं नाही लक्ष..!

FAQ

faq

नवजात स्क्रिनिंग चाचणीमध्ये आणखी काय समाविष्ट आहे?
नवजात बाळाच्या तपासणी चाचणीमध्ये फॅटी ऍसिड विकार, ऑरगॅनिक ऍसिड विकार, प्राथमिक जन्मजात हायपोथायरॉईडीझम, गॅलेक्टोसेमिया, सिकलसेल रोग तपासले जातात.

नवजात मुलांची स्क्रीनिंग चाचणी का केली जाते?
ही साधी रक्त तपासणी डॉक्टरांना लहान मुलांमधील दुर्मिळ अनुवांशिक, हार्मोनल आणि चयापचय विकार शोधण्यात मदत करते जे जीवघेणे असू शकतात.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …