Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सत्तूचे ड्रिंक ठरेल वरदान, डायबिटीस रूग्णांसाठीही फायदेशीर

आपली आजी बरेचदा नातवंडांना सकाळी वा संध्याकाळच्या वेळी एक ग्लास सत्तूची पेज देताना दिसायची. त्यावेळी कदाचित त्याचे महत्त्व कळत नाही. मात्र आरोग्यासाठी सत्तू हे अत्यंत पोषक तत्व आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि लवकर थकायला होत नाही. आजही सत्तूचे सेवन भारतामध्ये अधिक प्रमाणात केले जाते. भाजलेली डाळ आणि धान्य यांचे मिश्रण म्हणजे सत्तू. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर सत्तूचा फायदा नक्कीच करून घेता येतो. यासाठी सत्तूचे ड्रिंक कसे बनवयाचे जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​वजन कमी करण्यासाठी फायदेशीर​

​वजन कमी करण्यासाठी फायदेशीर​

Sattu For Weight Loss: सत्तूमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर आढळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा अधिक उपयोग होते. सत्तू खाल्ल्याने पोट अधिक भरलेले राहते. ज्यामुळे अधिक भूक लागत नाही आणि वजनाची वाढ होत नाही. याशिवाय सत्तू सकाळी खाल्ल्याने खाण्यावर नियंत्रण येते आणि वजन कमी होण्यासही फायदा होतो. यामुळे दिवसभर अधिक खाल्ले जात नाही.

हेही वाचा :  Weight Loss: चिकन की पनीर, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काय चांगले, जाणून घ्या

​मसल्स होतात मजबूत ​

​मसल्स होतात मजबूत ​

मसल्स अर्थात हाडं मजबूत होण्यासाठीही सत्तूचा उपयोग होतो. याशिवाय तुम्ही शरीर कमावण्यासाठी अथवा बॉडी बिल्डिंगसाठी प्रयत्न करत असलात तर डाएटमध्ये सत्तूचा नक्की समावेश करून घ्या. सत्तूचे मिल्कशेक अथवा सत्तूच्या ड्रिंकमुळे फायदा मिळतो. यातील प्लांट बेस्ड प्रोटीन तुमचे शरीर आणि हाडं मजबूत करण्यास मदत करतात.

(वाचा – फ्रिजमध्ये किती वेळ अन्न साठवणे ठरते योग्य? नाहीतर तुमच्या पोटात ‘विष’ जातंय हे समजा)

​मधुमेही व्यक्तींना मिळतो फायदा​

​मधुमेही व्यक्तींना मिळतो फायदा​

मधुमेही व्यक्तींसाठी सत्तू फायदेशीर ठरते. वजन आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा फायदा मिळतो. सत्तूमधील फायबर हे मधुमेही रूग्णांना फायदा मिळवून देते.

(वाचा – डायबिटीसपासून PCOD पर्यंत नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरते बाजरीची भाकरी, जाणून घ्या फायदे)

​सत्तूचे फायदे​

​सत्तूचे फायदे​

Benefits Of Sattu: सत्तूमध्ये पोषक तत्व अधिक असतात. त्यामुळे आरोग्यासाठी सत्तूचे फायदे होतात. सत्तूचे फायदे नेमके कोणकोणते आहेत, ते जाणून घ्या.

  • हृदय रोग आणि मधुमेहासारख्या समस्यांसाठी याचा फायदा होतो. यामध्ये क्वालिटी प्रोटीन असते
  • कॅल्शियम, मँगनीज, लोह आणि मॅग्नेशियमसहित अनेक खनिजे सत्तूमध्ये असल्यामुळे शरीराला त्वरीत ऊर्जा देण्याचे काम करते
  • सत्तूच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते
  • याशिवाय फायबरचा उत्तम स्रोत म्हणून याची ओळख आहेपचनसाठी मदत करते
हेही वाचा :  Weight Loss करण्यासाठी डाएटिंग करायचा कंटाळा येत असेल तर वापरा या सोप्या टिप्स

​असे बनवा सत्तूचे ड्रिंक​

​असे बनवा सत्तूचे ड्रिंक​

How To Make Sattu Drink: घरच्या घरी तुम्ही सत्तूचे पेय बनवू शकता. हे कसे बनवायचे ते आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत.

  • सत्तू बनविण्यासाठी तुम्ही चणे अथवा चण्याची डाळ कढईत भाजून घ्या (चणे सोलून मगच भाजा)
  • थंड झाल्यावर त्याचे पीठ करा
  • एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या
  • त्यात २-३ चमचे सत्तू मिक्स करून चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर मिक्स करा
  • लिंबाचा रस आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घाला आणि हे ड्रिंक प्या

​सकाळी सत्तू कसे प्यावे?​

​सकाळी सत्तू कसे प्यावे?​

रोज सकाळी तुम्ही उपाशीपोटी सत्तूचे सेवन केल्यास, पचन चांगले होण्यास आणि पोट स्वच्छ होण्यासाठी याचा फायदा होतो. पचनशक्ती सुधारल्यावर वजन आपोआप कमी होण्यास मदत मिळते. सत्तू कोलन स्वच्छ करून असिडीटी, सूज आणि क्लॉनिंगसारख्या समस्या सोडविण्यासाठीही उपयोगी ठरते

(वाचा – लहानपणी या आजाराशी झुंजत होता अभिषेक, ९ व्या वर्षी दुर्लक्ष केले असते तर ठरला असता गंभीर)

​सत्तू कोणी खाऊ नये​

​सत्तू कोणी खाऊ नये​

सत्तूचा पचनक्रियेवर अधिक परिणाम होत असतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना पहिल्यापासूनच पोटात गॅस, अपचनाची समस्या असेल त्यांनी सत्तू खाऊ नये अथवा कमी प्रमाणात खावे. याप्रमाणे बद्धकोष्ठता असणाऱ्या रूग्णांनीही सत्तूचे सेवन करणे टाळावे.

हेही वाचा :  'किती वेड्यात काढणार? फडणवीसांना सांगतोय की मराठा समाजाला...'; सभेआधीच जरांगे कडाडले

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …