Weight Loss करण्यासाठी डाएटिंग करायचा कंटाळा येत असेल तर वापरा या सोप्या टिप्स

आपले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्ती आपण करत असतो. कधी जेवणात बदल, कधी चालायला जाणे तर कधी व्यायाम करणे. पण त्यात बरेचदा नियमितपणा कामामुळे राहात नाही. बरेचदा अनेकदा डाएटिंगच्या नावाखाली अनेक तास उपाशी राहतात पण ते योग्य नाही. फिटनेस आणि वजन कमी करणे हे सध्या सगळ्यांसाठीच एक आव्हान झाले आहे. पण डाएटिंग करून तुम्ही थकला आहात आणि तरीही तुमचं वजन कमी होत नाहीये तर तुमच्या काही सवयी सोडल्यास तुम्हाला नक्कीच वजन कमी करता येईल. डाएटिंगशिवायदेखील तुम्ही वजन कमी करू शकता. नक्की कशा पद्धतीने तुम्ही हे वजन कमी करू शकता याबाबत महत्त्वाची माहिती.

कॅलरी कमी करा

खरं तर वेट लॉस करण्यासाठी खूप वेगळ्या डाएटिंगची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या नेहमीच्या जेवणातून कॅलरीचे अधिक असणारे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. लो कार्ब आणि हाय प्रोटीनचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश केल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत मिळेल. आपल्या डाएटमधून कार्ब कायमचे काढून टाकण्याची अजिबात गरज नाही. कारण तुम्ही व्यायाम करत असाल तर चांगल्या एनर्जीसाठी तुम्हाला कार्बची गरज भासते. त्यामुळे जर आठवड्यातून नियमित व्यायामाला वेळ मिळत नसेल तर जेवणातून कॅलरी कमी करा.

हेही वाचा :  मी एका अशा पुरूषाच्या प्रेमात पडली आहे जे प्रेम जगाला व कुटुंबाला कधीच मान्य होणार नाही

सतत बसून राहू नका

ऑफिसच्या निमित्ताने अथवा बरेचदा मोबाईल वा लॅपटॉपवर काम करताना आपण सतत बसून राहातो. त्यामुळे खाल्लेले अन्न अजिबात पचत नाही. त्यामुळे काही वेळाने मधून मधून उठा आणि दोन ते चार फेऱ्या मारा अथवा ५ मिनिट्स ब्रेक घेऊन ऑफिसमध्ये वा घरात चाला. यामुळे अन्न पचेल. वजन वाढणार नाही. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. मोबाईलवर बोलताना बसून बोलण्यापेक्षा चालत बोला. (वाचा – Bharti Singh Weight Loss Journey: खाणेपिणे न सोडता १५ किलो वजन केले कमी, कसे ते घ्या जाणून)

व्यायामाची पातळी वाढवा

खाण्यात डाएट करण्यापेक्षा तुम्ही जो व्यायाम करत आहात, त्याची पातळी वाढवा. व्यायामाने तुम्ही कॅलरी अधिक प्रमाणात बर्न करू शकता. तसंच व्यायाम केल्याने तुमचे हृदय, उच्च रक्तदाब, साखरेतील रक्ताची पातळी आणि मानसिक आरोग्य सर्वच योग्य राहण्यास मदत मिळते. पण डाएट करण्यापेक्षा व्यायाम करण्यावर अधिक भर दिल्यास, वजन लवकर कमी होते. इतर कोणताही व्यायाम जमत नसेल तर दिवसातून किमान ८००० ते १२००० पावलं तुम्ही चालावीत. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.(वाचा – Weight Loss साठी करण्यात येणारे इंटरमिटेंट फास्टिंग कोणी करू नये, महत्त्वाची माहिती)

हेही वाचा :  वजन कमी करण्यासाठी चुकीच्या डाएटचे फॅड टाळा, अन्यथा होईल विपरीत परिणाम

पूर्ण झोप घ्या

वजन कमी करण्यासाठी तुमची झोप चांगली होणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीरातील मसल्सची रिकव्हरी होते. तुम्ही रात्री ७ तासापेक्षा अधिक झोप घेत असाल तर तुमच्या वजन कमी होण्यासाठी याचा फायदा होतो. तुमचे फॅट बर्निंग जलद होते आणि शरीरातील मेटाबॉलिजमदेखील चांगले राहाते. (वाचा – नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी वापरा या सोप्या २ पद्धती, घरगुती उपाय)

प्रोसेस्ड फूड टाळा

वजन कमी करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही प्रोसेस्ड फूड खाणे सहसा टाळा. वेट लॉस करताना तुम्हाला रेडी टू इट प्रोसेस्ड फूटपासून लांबच राहायला हवे. मॅगी, तळलेले फ्रोजन पदार्थ, पॅक्ड फूड याचा कमी वापर करावा. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन कमी करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी. तसंच अन्न पूर्णतः चावून खावे.

डाएटिंग करणे चांगलेच आहे. मात्र डाएट करता येणं शक्य नसेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा आणि नव्या वर्षाचा संकल्प असेल बारीक होण्याचा तर तो नक्की पूर्ण करा.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

हेही वाचा :  देबिना बॅनर्जीने अनोख्या पद्धतीने दुसऱ्या मुलीचं नाव केलं शेअर, अर्थ कळताच अंतःकरणापासून जोडाल हात

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …