रिकाम्या पोटी गुळाचे पाणी पिणे गुणकारी, बॉडी डिटॉक्ससह होतील हे ५ फायदे

गूळ (Jaggery) हा एक नैसर्गिक गोडवा असलेला पदार्थ आहे. जो वेगवेगळ्या रंगात आणि चवींमध्ये सहज उपलब्ध होतो. हिवाळ्यात गुळ हे खूप फायदेशीर मानले जाते. हे मुख्यतः चहा, गुळाची मिठाई, खीर किंवा रोटीसोबत खाल्ले जाते. गुळात पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि तांबे यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. त्यामुळे प्रदूषित शहरात राहत असाल किंवा थंडीचात त्रास होत असेल तर तुमच्या आहारात गुळाचा समावेश नक्की करा.

आयुर्वेदानुसार गरम पाण्यात गुळ मिसळून प्यायल्याने आरोग्यासाठी उत्तम एंटीडोट म्हणून काम करते. हे नैसर्गिक पाचक एन्झाईम्स वाढवते, पचन गती वाढवते आणि मूत्रपिंड संबंधित आजारांसाठी देखील उपयुक्त आहे.

योग प्रशिक्षक अवनी तलसानिया देखील रोज सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे पाणी खातात. आईस्ड टी आणि लिंबूपाणीसाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे यासोबतच गुळाचे पाणी देखील प्यावे. वैद्यकीय पुस्तकांमध्येही या उपायाचे फायदे सांगितले आहेत.

हेही वाचा :  आतड्यांना पिळवटून टाकणाऱ्या मुळव्याधावर आयुर्वेदिक उपाय, ऑपरेशनशिवाय व्हाल बरे

तज्ज्ञांकडून जाणून घ्या गुळाचे पाणी पिण्याचे फायदे

​सर्दी होते कमी

पौष्टिकतेने युक्त असलेल्या गुळामुळे सर्दी, खोकला आणि फ्लूची लक्षणे दूर होतात. यात अनेक फिनोलिक संयुगे असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढतात, शरीराला आराम देतात आणि आपले आरोग्य प्रभावीपणे व्यवस्थापित करतात.

(Gut Health : हेल्दी जेवणच बद्धकोष्ठता आणि अपचनाला जबाबदार, आठवणीने खा ५ प्रीबायोटिक फूड्स)

बॉडी डिटॉक्स करता फायदेशीर

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी गुळाचे पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गुळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे तुमची पचनसंस्था सहज साफ करण्यास मदत करते. हे श्वसन प्रणाली, फुफ्फुस, अन्ननलिका, पोट आणि आतडे देखील स्वच्छ करते.

(वाचा – Fruits for Diabetes : ५ फळं खाऊन कंट्रोलमध्ये ठेवा डायबिटिज, इतर आजारांपासूनही होईल सुटका)

​रोगप्रतिकारक शक्ती वाढते

गुळाचे पाणी संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. खरं तर, गूळ मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे B1, B6 आणि C चा चांगला स्रोत आहे. यासोबतच गुळात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितल्या प्रवासातील ४ बेस्ट टिप्स, यामुळे तुमचा प्रवास होईल अधिक सुखकर))

हेही वाचा :  लठ्ठपणावर मात करायचीय? ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या ८ टिप्स फॉलो करा, चरबी सगळी वितळून जाईल

​वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी गुळाचे पाणी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट आणि मिनरल्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. चयापचय वाढवते आणि चरबी कमी करते.

​कसे तयार कराल गुळाचे पाणी

साहित्य

  • गूळ
  • चिया सिड्स
  • लिंबू
  • पुदीना पाने

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितले 5 एनर्जी बूस्टर फूड, इम्युनिटी पॉवरसाठी सगळ्यात बेस्ट)

असे बनवा

  • गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेपर्यंत उकळवा
  • 10-15 मिनिटे थंड होऊ द्या
  • गुळाच्या उकळलेल्या पाण्यात ३-४ लिंबू पिळून घ्या
  • आणखी अर्धा तास थंड होऊ द्या
  • सर्व्ह करण्यापूर्वी चांगले हलवा
  • चांगल्या चवीसाठी चिया बिया आणि पुदिन्याची पाने घाला

(वाचा – How to Reduce Blood Sugar in 15 Days: आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं खास चूर्ण, १५ दिवसांत कमी होणार ब्लड शुगर))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …