लठ्ठपणावर मात करायचीय? ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या ८ टिप्स फॉलो करा, चरबी सगळी वितळून जाईल

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने नुकताच इंस्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड केलाय. ज्यामध्ये चुकीच्या जीवनशैलीवर भाष्य केलं आहे. म्हणजे तुम्ही कितीही व्यायाम केले, डाएट केला, योगा केला तरीही शरीरावर काहीच परिणाम होणार नाही. कारण तुम्ही केलेली ही एक चूक लठ्ठपणाला जबाबदार ठरते.

ऋजुता दिवेकरने आपल्या पोस्टमध्ये ८ गाईडलाईन शेअर केल्या आहेत. तुमचं रूटीन कितीही व्यस्त असू दे या ८ गोष्टी न चुकता फॉलो केलात. तर तुम्हाला लठ्ठपणाला सामोरे जावे लागणार नाही. अगदी रूटीनमध्ये सहज या ८ गोष्टी जोडा आणि लठ्ठपणाला दूर करा. (फोटो सौजन्य – iStock)

ऋजुता दिवेकर टिप्स

​बसू नका, हालचाल करा

​बसू नका, हालचाल करा

३० मिनिटे बसल्यावर ३ मिनिटे उभे राहा. अनेकदा आपल्यापैकी अनेकांच काम हे बसून असते. अशावेळी अगदी ३० मिनिटे नाही पण हातातील काम झाल्यावर उठणं अतिशय गरजेचे आहे. काम झाल्यावर चालला नाहीत तरी चालेल पण उभे राहा दोन्ही पायांवर अगदी व्यवस्थित.
उभे राहताना देखील एक नियम आवर्जून पाळा. दोन्ही पायांवर समान वजन देऊन उभे राहा. सोप्या शब्दात सांगायचं तर विश्राम स्थितीत उभे राहा. एका बाजूला झुकून उभे राहू नका.

हेही वाचा :  हे 4 उपाय नऊ रात्रींमध्ये जाळतील पोट, मांड्या व कंबरेवरची एकूण एक चरबी, पाठ-पोट होईल सपाट

​चालण्याचा पर्याय निवडा

​चालण्याचा पर्याय निवडा

चालणं हा पर्याय कायमच फायदेशीर ठरतो. अशावेळी तुम्ही ऑफिसला जाताना किंवा घरी जाताना जिने चढण्याचे पर्याय निवडा. रोज किमान ४ मजले वर जा.
तसेच कार दूर पार्क करून चालण्याचा पर्याय निवडा. कमी अंतराच्या ठिकाणी गाडी न नेता चाला. किमान ५०० पायऱ्या दररोज चढा-उतारा.

(वाचा – बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्याकरता सर्वोत्तम ठरते ‘ही’ भाजी, हाडांना १०० टक्के करेल मजबूत)

​या गोष्टी न ​चुकता करा

​या गोष्टी न ​चुकता करा

आठवड्यातून एक दिवस वेगळा असू द्या. जसे की, मुलांना पार्क, गार्डन किंवा इतर ऍक्टिविटीला घेऊन जा. मुलांना नातेवाईक किंवा मोकळ्या पर्यावरण असलेल्या ठिकाणी घेऊन जा.
तसेच आठवड्यातील एक काम गॅजेट शिवाय करा. जसे की, कपडे धुणे, घरातील भांडी घासणे, घर झाडून घ्या जेणे करून शरीराची हालचाल होऊ शकते. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

​(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितल्या, वजन कमी करताना हमखास केल्या जाणाऱ्या ३ चुका) ​

​शतपावली महत्वाची

​शतपावली महत्वाची

पुरूषांनी देखील अन्न शिजवण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तुम्ही फक्त डाळ भात किंवा खिचडी बनवू शकता पण चांगल्या आरोग्यासाठी पोषक वातावरण तयार करणे देखील महत्त्वाचे आहे. रात्रीच्या जेवणानंतर 100 पावले किंवा शतपावली चालणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  राणी एलिझाबेथने मृत्यूनंतर ठेवले हिरेजडीत मौल्यवान दागिने मागे, शाही दागिन्यांची किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल

​(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितल्या Weight Loss मध्ये होणाऱ्या हमखास ३ चुका, यामुळे इंचभरही हटणार नाही चरबी)​

पोटाची चरबी कमी करण्यासाठी

Benefit Of Bhujangasana | पोट कमी करण्यासाठी भुजंगासन कसे करावे | Maharashtra Times

​हालचाल किती महत्वाची​

​हालचाल किती महत्वाची​

तुम्हाला कदाचित हालचाल आणि क्रियाकलापांचे महत्त्व कळत नसेल पण यामुळे मेंदूची प्लॅस्टिकिटी ठरते. विशेषत: वृद्ध लोकांमध्ये, पाठदुखी, मधुमेह, हृदयविकार आणि अगदी नैराश्य टाळण्यास मदत होते. कारण हालचाल ही व्यायामापेक्षा वेगळी असते. त्याला पर्याय नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …