राणी एलिझाबेथने मृत्यूनंतर ठेवले हिरेजडीत मौल्यवान दागिने मागे, शाही दागिन्यांची किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल

यावर्षीच 70 वर्षांपासून ब्रिटनची गादी सांभाळणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. पण त्यांच्या जाण्यानंतर देखील त्याची अनेक कारणांनी चर्चा होत असते. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे अखेरचा श्वास घेतला. 96 वर्षीय राणी काही काळापासून एपिसोडिक मोबिलिटी नावाच्या आजाराशी झुंज देत होत्या, त्यामुळे त्यांना उभे राहण्यास आणि चालण्यास त्रास होत होता. सध्या त्यांचे दागिन्यांचे कलेक्शन समोर आले आहे. फॉर्च्यून मासिकाच्या अहवालानुसार, राणीने 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे 39.8 अब्ज रुपयांची संपत्ती मागे ठेवली आहे. त्याच्याकडे सुंदर दागिन्याचे कलेशन देखील होते. राणीच्या शाही पेटीत कोहिनूर त्याच प्रमाणे एक ब्रोच-याशिवाय लाखो दागिने आहेत, त्यापैकी काही टॉवर ऑफ लंडनमध्ये प्रदर्शनात आहेत. स्टीव्हन स्टोन ज्वेलर्सचे डायमंड तज्ञ मॅक्स स्टोन यांनी डेली एक्सप्रेसला सांगितले की राणीच्या ब्रोचची किंमत सुमारे £58 दशलक्ष आहे. (सर्व फोटो – Getty Images)

​आजीकडून मिळाला मुकुट

राणी एलिझाबेथच्या रॉयल कलेक्शनमध्ये तिच्या सर्वात आवडत्या मुकुटाचा समावेश आहे, जो तिला तिची आजी, क्वीन मेरीकडून लग्नाची भेट म्हणून मिळाला होता. द कोर्ट ज्वेलरच्या म्हणण्यानुसार, दिवंगत सम्राटाने 1800 च्या दशकात हा ऍमेथिस्ट मुकुट विकत घेतला होता. (वाचा :- बनारसी साडी, लिपस्टिक लावून 24 वर्षांच्या अँड्रिलाला जड अंतःकरणाने निरोप, पायाचे चुंबन घेताना बॉयफ्रेंडला अश्रू अनावर)

हेही वाचा :  देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो, प्रकाश आंबेडकरांचा दावा

​300 डायमंड नेकपीस

300-

1947 मध्ये जेव्हा राणी एलिझाबेथ द्वितीयने एडिनबर्गच्या ड्यूकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हैदराबादचा शासक मीर उस्मान अली खान उर्फ असफ जाह सातवा याने राजकुमारीला एक भव्य लग्न भेट देण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी तिने जगातील फ्रेंच लक्झरी फॅशनची सूचना दिली. ब्रँड ‘कार्टियर’ राजकुमारीला त्यांच्या वर्तमान स्टॉकमधून असे काहीतरी निवडण्यास सांगेल जे यापूर्वी कोणी पाहिले नव्हते. अशा परिस्थितीत राणीने स्वत:साठी असा नेकपीस निवडला होता. या हारामध्ये 300 हिरे वापरण्यात आले होते.

​वडिलांकडून शाही हार मिळाला

राणी एलिझाबेथ यांच्याकडे नीलम आणि हिर्‍याचा शाही हार होता, जो तिला तिचे वडील किंग जॉर्ज सहावा यांच्याकडून लग्नात मिळाला होता. या नेकलेसची किंमत करोडोंमध्ये आहे. हा हार राजा चार्ल्सची पत्नी क्वीन कॉन्सॉर्ट कॅमिला यांच्याकडे आहे. या शाही हाराला पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. (वाचा :- G20 Summit: पंतप्रधान मोदींचा स्वदेशी कपड्यांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट पाहा फोटो)

​ट्रिपल-स्ट्रँड मोत्याचा हार

क्वीन एलिझाबेथ II चा ट्रिपल-स्टँड मोत्याचा हार आणि मॅचिंग स्टड कानतले खूपच प्रसिद्ध आहेत. हा हार त्यांचे आजोबा किंग जॉर्ज यांच्याकडून वारसा मिळाला. हा हार महाराणीच्या आजोबांनी स्वतःसाठी बनवला होता. हा नेकपीस एलिझाबेथच्या आवडत्या दागिन्यांपैकी एक होता. हा हार खूपच प्रसिद्ध आहे. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  Barsu Refinery : बारसूमध्ये विरोधानंतरही रिफायनरीचा सर्व्हे सुरु, बैठकीत तोडगा नाही

​मोत्यांचे कानातले

राणी एलिझाबेथ II चा एक फोटो पाहायला मिळत आहे. त्यामध्ये राणी व्हिक्टोरियाला वारशाने मिळालेले कानातले पाहायला मिळत आहे. हे कानातले राणी व्हिक्टोरियन राणीला तिचा पती प्रिन्स अल्बर्टने दिले होते. हे कानातले खूपच सुंदर दिसत होते. (वाचा :- कियारा आडवाणीला डेनिम फिव्हर, बारीक नॉट्सचा डीपनेक टॉप आणि स्किन फिट पॅन्ट घालून चुकवला चाहत्यांचा हृदयाचा ठोका)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …