जिनिलियाची खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Genelia Deshmukh: अभिनेत्री  जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि तिचा पती अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलिया आणि रितेश हे गेली 20 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. चित्रपटातील गाणी, चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील एका सिनचा व्हिडीओ जिनिलियानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यामातून जिनिलियानं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 

जिनिलियाची पोस्ट

जिनिलियानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांनी वेड चित्रपटाला दिलेला प्रतिसाद दिसत आहे. जिनिलियानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, ‘रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.’ जिनिलियानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

हेही वाचा :  Wedding Bells : यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार रश्मिका अन् 'हा' अभिनेता, अफेअरच्या चर्चांना उधाण!

नेटकऱ्यांच्या कमेंट्स:

live reels News Reels

एका युझरनं जिनिलियानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली, ‘मराठी नसून ऐवढ छान मराठी बोलन सोप्प नाही. नो ओवरएक्टिंग..सुंदर अभिनय..छान डायरेक्शन..हॅट्स ऑफ’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘वहिनी खरंच खूप चांगली अॅक्टिंग केलीय. अभिमान आहे तुमचा रितेश दादा आणि वहिनी.’


रिलीज झाल्यानंतर पाच दिवसांमध्ये वेड या चित्रपटानं 13.02 कोटींची कमाई केली. तर ओपनिंग-डेला या चित्रपटानं  2.25 कोटींची कमाई केली.  संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. वेड चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशनं केलं असून चित्रपटाची निर्मिती जिनिलियानं केली आहे.   अशोक सराफ, विद्याधर जोशी,शुभंकर तावडे या कलाकारांनी देखील वेड या चित्रपटामध्ये काम केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ved Box Office Collection: रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ ला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …