Riteish Deshmukh Genelia Deshmukh : लाडक्या दादा-वहिणीचं चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून कौतुक

Abhishek Bachchan On Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) सध्या ‘वेड’ (Ved) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अशातच अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) खास पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनिलियाचं जाहीर कौतुक केलं आहे. 

अभिषेकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर ‘वेड’ (Ved Movie) सिनेमाच्या कमाईचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”कमाल… रितेश – जिनिलाया तुम्ही खरचं एक चांगली कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणखी आहे. तुम्हाला मिळत असलेल्या यशाबद्दल मला नक्कीच आनंद आहे”. 

अभिषेकची पोस्ट शेअर करत जिनिलियाने (Genelia DSouza) लिहिलं आहे,”अभिषेक खूप खूप आभार… सुरुवातीपासूनच तू माझ्या आणि रितेशच्या पाठिशी होतास”. रितेश आणि जिनिलियाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

‘वेड’ बॉक्स ऑफिस कलेक्शन (Ved Box Office Collection) 

रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने आठवड्याभरातच बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाच्या कमाईचा आलेख चढताच आहे. रिलीजच्या नवव्या दिवशी या सिनेमाने तब्बल पाच कोटींचा गल्ला जमवला आहे. वर्षाच्या सुरुवातीला या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 20 कोटींची कमाई करत मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखलले आहेत. 

हेही वाचा :  Shilpa Shetty : खटल्यातून आरोपमुक्तीसाठी शिल्पा शेट्टीची हायकोर्टात याचिका

live reels
News Reels


‘वेड’ हा सिनेमा आता किती कमाई करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या सिनेमात रितेशने दुहेरी भूमिका बजावली आहे. अभिनय करण्यासोबत त्याने या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमतातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राची लाडकी वहिणी अर्थात जिनिलियाने या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 

संबंधित बातम्या

Ved Box Office Collection : लय भारी! रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ची आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …