रितेश-जिनिलियाच्या ‘Ved’ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट…

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) या सिनेमाची दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घौडदौड सुरू आहे. या सिनेमाने आता नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) बहुचर्चित ‘सैराट’ (Sairat) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 

सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमाने 12.10 कोटींची कमाई केली होती. आता ‘वेड’ या सिनेमाने हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘वेड’ या सिनेमाने आतापर्यंत 33.42 कोटींची कमाई केली आहे. 

‘वेड’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Ved Box Office Collection) 

पहिला दिवस – 2.25 कोटी
दुसरा दिवस – 3.25 कोटी
तिसरा दिवस – 4.50 कोटी
चौथा दिवस – 3.02 कोटी
पाचवा दिवस – 2.65 कोटी
सहावा दिवस – 2.55 कोटी
सातवा दिवस – 2.45 कोटी
आठवा दिवस – 2.52 कोटी
नऊवा दिवस – 4.53 कोटी
दहावा दिवस – 5.70 कोटी
एकूण कमाई – 33.42 कोटी


रिलीजच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ‘वेड’ (Ved) या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. दुसऱ्या रविवारी या सिनेमाने 5.70 कोटींचा गल्ला जमवला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईचा आलेख वाढत चालला आहे. रिलीजच्या दहा दिवसांनंतरही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. 

हेही वाचा :  'गडद अंधार' चित्रपटातील 'दरिया, दरिया...' गाणं प्रदर्शित

रितेश आणि जिनिलियाचा (Genelia DSouza) ‘वेड’ (Ved Movie) हा सिनेमा चाहते पुन्हा पुन्हा आवडीने पाहत आहेत. या सिनेमाचे चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून कौतुक होत आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा किती कमाई करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

संबंधित बातम्या

Ved Box Office Collection : लय भारी! रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ची आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …