रणबीर की आलियासारखी? कपूर घराण्यातील छोटी परी दिसते कशी?

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी काल (6 नोव्हेंबर) चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. अनेक जण सध्या आलिया आणि रणबीरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शुभेच्छा देत आहेत. नुकताच नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीतू कपूर  (Neetu Kapoor) यांनी आलियाच्या हेल्थबाबात अपडेट दिली तसेच कपूर घराण्यातील छोटी परी कशी दिसते? या चाहत्यांच्या प्रश्नाचे देखील उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाल्या नीतू कपूर? 
एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नीतू कपूर या एका गाडीमधून उतरत आहेत. यावेळी तेथील फोटोग्राफर्स आणि पॅपराजीनं नीतू कपूर यांना काही प्रश्न विचारले. या प्रश्नांना नीतू कपूर यांनी उत्तर दिलं. 

एका फोटोग्राफरनं नीतू कपूर यांना प्रश्न विचारला, ‘आलिया भट्ट कशा आहेत?’ तर नीतू कपूर यांनी उत्तर दिलं, ‘ती बरी आहे.’ तसेच एका फोटोग्राफरनं विचारलं, ‘तुम्हाला कसं वाटत आहे.’ या प्रश्नाला उत्तर देत नीतू कपूर म्हणाल्या, ‘तू मला नेहमी हा प्रश्न विचारतो. मला छान वाटत आहे. मी आनंदी आहे.’ ‘रणबीरसारखी की आलियासारखी बेबी गर्ल कशी दिसते?’ असा प्रश्न देखील फोटोग्राफरनं विचारला. यावेळी नीतू कपूर म्हणाल्या, ‘ती खूप लहान आहे. त्यामुळे ती कोणासारखी दिसते, हे आता सांगू शकत नाही. पण ती खूप क्यूट आहे’


आई झाल्यानंतर आलियानं एक पोस्ट शेअर केली. ‘आमच्या आयुष्यातील ही सर्वात बेस्ट बातमी. आमचं बाळ या जगात आलं आहे. ती मॅजिकल गर्ल आहे. आम्ही आता पालक झालो आहोत.’ ही पोस्ट शेअर करुन आलियानं कॅप्शनमध्ये ब्लॅक हार्ट इमोजीचा वापर केला आहे. आलियानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एका सिंहाच्या कुटुंबाचा फोटो दिसत आहे.

हेही वाचा :  Year Ender 2022 : 'हे' सिनेमे अडकले वादाच्या भोवऱ्यात

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Alia-Ranbir Welcome Baby Girl: माधुरी दीक्षित,अक्षय कुमार अन् अनुष्का शर्मा; आलिया रणबीरला सेलिब्रिटींकडून शुभेच्छा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …