मुंबईहून पुणे गाठा फक्त 90 मिनिटांत, ट्रॅफिकचेही टेन्शन नाही, नवीन पुल खुला होतोय

Mumbai Trans Harbour Link: मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) पूल पुढच्याच महिन्यात नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातच हा पुल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. हा पुल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. त्याचबरोबर मुंबईहून पुणे गाठणे सोप्पे होणार आहे. जाणून घेऊया कसा आहे मार्ग. (Mumbai Trans Harbour Link Update)

मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक हा समुद्रावर उभारण्यात आला असून हा पूल 22 किमी लांब आहे. पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. 22 किमीपैकी 16 किमीपर्यंतचा भाग समुद्रावर बांधण्यात आला आहे. 25 डिसेंबर रोजी मुंबई ट्रान्स लिंक प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. एमटीएचएल पुल सुरू झाल्यानंतर मुंबईहून-नवी मुंबईपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे. त्याचबरोबर वाहतुक कोंडीपासूनही सुटका होणार यामुळं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. 

मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक पुल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिरलेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. एमटीएचएल पुल सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणेपर्यंतचा प्रवासही सोप्पा आणि जलद होणार. लोणावळा- खंडाळा आणि मुंबईपर्यंतचा प्रवास 90 मिनिटांत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

हे ही वाचाः मुंबई ते नवी मुंबई गाठा फक्त 15 मिनिटांत प्रवास, पुढच्याच महिन्यात खुला होतोय समुद्रातील ‘हा’ पुल

सध्याचा पुण्याला जाण्याचा मार्ग 

पी डी. मेलो रोडवरून फ्रीवे त्यानंतर सायन-पनवेल द्रुतगती मार्ग आणि मग तुम्ही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करता. यापुढे तुम्ही गोव्याकडेही प्रवास करू शकता. यामध्ये NH48, NH748 असे दोन मार्ग लागतात. 

भविष्यात पुण्याला जाण्याचा मार्ग

पी डी. मेलो रोडवरून फ्रीवे त्यानंतर (शिवडीच्या पुढे बाहेर पडावं लागणार), नंतर तुम्ही मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकवरून पुढे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर चिर्ले मार्गाने प्रवास कराल. पुढे हा मार्ग गोव्यापर्यंत जाणार आहे. या प्रकल्पामुळं प्रवासातील 90 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची वैशिष्ट्ये

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी 18 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. देशातील सर्वात लांब समुद्री पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 16.5 किमी लांब डेक असलेला हा भारतातील पहिला पूल असणार आहे. पुलाचा सर्वात मोठा हिस्सा समुद्रावर असल्याने आपत्तकालीन मदत लवकर मिळावी या हेतूने योजना बनवण्यात आली आहे. 

हेही वाचा :  Jio होळी धमाका! रोज २.५ जीबीपर्यंत डेटा देणारे प्लान लाँच, जाणून घ्या | Reliance Jio Launch 2 Plan for Work From Home



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …