Alert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना सावध केलं आहे. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करु नका, अशी महत्त्वाची सूचना SBI नं केलीय. QR कोडचा वापर हा फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. 

QR कोड स्कॅन करुन कधीही पैसे मिळत नाहीत. QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा, असं कुणीही सांगितलं तर ती फसवणूक असेल आणि तुम्ही स्कॅन करताच काही क्षणांत तुमचा अकाऊण्ट रिकामा होईल, असा इशारा स्टेट बँकेने दिला आहे.

गेल्या काही वर्षात ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. यात फसवुणीच्या सर्वाधिक घटना या मोबाईलच्या क्यूआर कोडवरुन झाल्या आहेत. त्यामुळे एसबीआयने आपल्या 44 कोटींहून अधिक ग्राहकांना सावध केलं आहे. 

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना 

– QR कोड स्कॅन करुन पैसे मिळत नाहीत

– QR कोड पैसे ट्रान्सफरसाठी वापरा, पैसे मिळवायला नाही

– UPI पिन पैसे ट्रान्सफरसाठी वापरा, कोणालाही सांगू नका

– पैसे मिळणवण्यासाठी कधीही UPI पिन सांगावा लागत नाही

हेही वाचा :  याला म्हणतात देशप्रेम! रशियन फौजांना रोखण्यासाठी तो पुलावर उभा राहिला अन्…

– पैसे ट्रान्सफर करण्याआधी UPI आयडीची खात्री करा

क्यूआर कोड म्हणजे काय?

स्मार्ट फोन आणि पैशांचा व्यवहार करण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करत असाल, तर तुम्हाला  QR तंत्रज्ञानाची ओळख असेलच.  QR कोड म्हणजेच Quick Response Code. QR कोड हा एक प्रकारचा बार कोडच असतो, पण यात मेमरी क्षमता ही बारकोड पेक्षा अधिक आहे. म्हणूनच जगभरात QR कोडचा वापर केला जातो. बारकोड पेक्षा हा जलद आणि वेगवान आहे. आज विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांसाठी पैसे देण्यासाठी क्यूआर कोड वापरले जात आहेत.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Crime News: महिलेने शिक्षकाला दिली ‘रात्रीची ऑफर’, जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्…

Bhilwada Crime News : पैशासाठी माणूस कोणत्या थरावर जाईल काही सांगता येत. कानावर विश्वास बसणार …

1500 च्या पावतीवर गाभाऱ्यातून दर्शन हा कोणता न्याय? कसला धंदा लावलाय?; महाकाल मंदिरातील VIDEO तुफान व्हायरल

Mahakaleshwar Temple Viral Video: मंदिरात दर्शन घेताना व्हीआयपींना रांगेत उभं न राहता थेट गाभाऱ्यात जाऊन …