वजन कमी करण्यासाठी चुकीच्या डाएटचे फॅड टाळा, अन्यथा होईल विपरीत परिणाम

प्रत्येकासाठी एकच आहार असतो असा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल. तुमच्यासाठी कोणता आहार सर्वोत्तम योग्य राहील हे ठरवताना तुमच्या शरीरातील चरबीची पातळी तपासणे आवश्यक आहे. जर तुम्ही खूप सडपातळ असाल, तर तुम्हाला जास्त उर्जायुक्त आहाराची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात चरबी जास्त असेल तर तुम्हाला कमी उर्जा असलेल्या आहारात फायदेशीर ठरतो. जास्त कोलेस्टेरॉल, उच्च रक्त शर्करा, कमी लोह, व्हिटॅमिन बी 12 ची खालावलेली पातळी किंवा तुमचे यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम करते हे जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी जिनल पटेल, आहारतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा, मुंबई यांच्याशी आम्ही बातचीत केली.

क्रॅश डाएटिंगचे फॅड

सोशल मीडियावरील विचित्र डाएट फॅड्सचा अवलंब करणे टाळा. केवळ प्रथिनांचा समावेश असलेला आहार आणि फळांचा समावेश असलेला हे सर्व काही चुकीचे मार्ग आहेत. तुमच्या शरीराला एकुण सर्वच प्रकारच्या आहाराची गरज असते मग ते गोड, आंबट किंवा कडू असो, परंतु केवळ थोड्या प्रमाणात. सर्वकाही खा परंतु केवळ संयमाने. जर तुम्ही या डाएट फॅड्सचे पालन केले तर तुम्ही कमकुवत होऊन आजारी पडू शकाल. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण ते तुमच्या शरीराला योग्य ठरतील की नाही हे तुम्ही स्वतःच ठरवून असे डाएट फॉलो करणे योग्य ठरणार नाही.

हेही वाचा :  दिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण

चुकीचे पदार्थ निवडणे

चांगला आणि वाईट असा कोणता प्रकार नसतो. तुम्ही जर आवड्याभरात १०० पौष्टीक पदार्थ खाल्ले आणि केवळ एखादा चटपटीत पदार्थ खाल्ला तर लगेचच तुमच्या शरीरात वाईट परिणाम होणार नाही.संतुलित आहारामध्ये प्रत्येक पदार्थाला स्थान दिले जाते. सर्व पोषक तत्वांचा आहारात समावेश असल्याची खात्री करा आणि आपले ताट नेहमी रंगीत पदार्थांनी भरलेले असू द्या. कोणताही पदार्थ अति आवडला म्हणून तो जास्त खाणे आणि बाकीच्या पदार्थांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यामुळे आपल्या शरीराला नक्की कसली गरज आहे हे समजून घेतल्यानंतरच वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करा. योग्य पदार्थांची निवड करा.

(वाचा – Winter Tips : रिकाम्या पोटी गुळाचे पाणी पिणे गुणकारी, बॉडी डिटॉक्ससह होतील हे ५ फायदे)

स्वतःच्या मर्जीने आहार

स्वतःच्या मर्जीने आहार न घेता आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि अभ्यासानंतर या विभागातील पदवी संपादन केली आहे. केवळ आवश्यक प्रमाणपत्रे असलेल्या आहारतज्ज्ञांना “आहारतज्ज्ञ” हे शीर्षक वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी इथे तिथे वापरलेली माहिती न वापरता तुम्ही आहारतज्ज्ञांची मदत घेणेच योग्य ठरेल.

हेही वाचा :  94 किलो मुलाने ही साधी घरगुती ट्रिक करून घटवलं 25 किलो वजन,दिसू लागला हिरोसारखा Slim-Trim

(वाचा – New Year 2023: नव्या वर्षात आहारात करा या ५ विटामिन्सचा समावेश)

प्रोसेस्ड फूड टाळा

फळे, भाज्या, सर्व प्रकारचे धान्य, कार्बोहायड्रेट्स,शेंगदाणे, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश फायदेशीर राहील. पुरेसे पाणी प्या, भरपूर फळे आणि ताज्या भाज्या खा, तुमच्या प्रत्येक आहारात प्रथिनांचा समावेश करा, प्रोसेस्ड फूड हे शरीराला हानिकारक ठरते. विशेषतः वजन कमी करायचे असेल तर तुम्ही याचे सेवन करणे शक्यतो टाळा. प्रोसेस्ड फूडमुळे वजन कमी करण्यात अडथळा निर्माण होतो.

(वाचा – हॉटेलमध्ये गेल्यावर अति खाणे टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स, वजन कमी करण्यासाठी होईल मदत)

आवडणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग

बरेचदा डाएटिंगच्या नावाखाली आपल्याला आवडतात त्या सर्व गोष्टींचा त्याग केला जातो. स्वतः डाएट निवडून तुम्ही जर असे करत असाल तर तुम्ही नक्कीच चुकत आहात. तुमचं सर्व लक्ष त्या पदार्थांमध्ये असतं. त्यामुळे अगदीच सर्व सोडून द्यायचं असं करू नका. कारण तुमच्या शरीराला त्या पदार्थांची गरज असेल हे तुम्हाला कळतच नाही आणि आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही हे डाएट फॉलो करायला सुरुवात करता. त्यामुळे त्याचा शरीरावर उलट परिणाम होऊ चुकीच्या पद्धतीने तुमचं वजन कमी तरी होतं अथवा वजन वाढूही शकतं.

हेही वाचा :  ऑक्टोबर हिटमध्ये ग्राहकांच्या खिशाला चटका; महाराष्ट्रात वीजबील इतक्या पैशांनी वाढणार

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करण्याची गरज आहे. वजन कमी करण्यासाठी व्हायरल झालेले अथवा सोशल मीडियावरील डाएटचे फॅड आणि प्लॅनचा वापर करणे सहसा टाळा. याचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरू शकतो.

(फोटो क्रेडिटः Canva)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …