Omicron BF.7 बाबत चुकूनही करू नका या ५ गोष्टी, बूस्टर डोस घेऊनही जीवाला मुकाल

Omicron BF.7 Variant करोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आहे. ज्याने चीनमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटमुळे चीनमध्ये मृतदेहांचा खच पडला आहे. स्मशानभूमीवर २० दिवस वाट बघायला लागत आहे.

भारतात ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना कोविड-१९ बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच गुरूवारी कोविड-१९ ची पहिली सुई विरहित नेजल व्हॅक्सीनच्या वापराला परवानगी दिली आहे.

ओमिक्रॉनच्या बीएफ.७ व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी कोविड व्हॅक्सीन फक्त पुरेसं नाही. योग्य ती काळजी घेणे गरदजेचे आहे. कारण कोरोना व्हायरस प्रकोपादरम्यान तुम्ही केलेली एक चूकही महागात पडू शकते. महत्वाचं म्हणजे तुम्ही बुस्टर डोस घेऊनही करोनाच्या नव्या व्हेरिएंटला रोखू शकत नाही. (फोटो सौजन्य -istock)

​कोविड व्हॅक्सीन ठरेल संजीवनी

Omicron चे नवीन प्रकार (Omicron New variant) टाळण्यासाठी भारत सरकार कोविड लस आणि बूस्टर डोस घेण्यास सांगत आहे. पण याचा अर्थ असा नाही की करोनाची लस संजीवनी आहे आणि ती मिळाल्यानंतर करोनाचा नवीन प्रकार तिला स्पर्श करू शकत नाही. विविध अहवालांनुसार, ज्या लोकांना लसीकरण करण्यात आले आहे त्यांना देखील Omicron BF.7 ची लागण होत आहे.

हेही वाचा :  Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...

(वाचा – Fruits for Diabetes : ५ फळं खाऊन कंट्रोलमध्ये ठेवा डायबिटिज, इतर आजारांपासूनही होईल सुटका)

​बूस्टर डोसला अमृत समझण्याची करू नका चुकी

काही लोकांना असे वाटू शकते की, बूस्टर डोस घेतल्यानंतरही Omicron BF.7 प्रकाराचा फक्त एक सौम्य संसर्ग होईल. सौम्य खोकला, सर्दी, ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात. पण ही एक मोठी चूक आहे, कारण खबरदारी न घेतल्यास, बूस्टर डोस घेतलेल्या लोकांसाठी कोरोना व्हायरस प्राणघातक ठरू शकतो.

(Gut Health : हेल्दी जेवणच बद्धकोष्ठता आणि अपचनाला जबाबदार, आठवणीने खा ५ प्रीबायोटिक फूड्स)

​फक्त एकदाच होतो कोविड इंफेक्शन

जर तुमचा असा विश्वास असेल की, कोविडचा संसर्ग फक्त एकदाच होतो. तुम्ही स्वतःला धोका देत आहात. कारण, कोविड-19 चा विषाणू अनेक वेळा लोकांना संक्रमित करत आहे. अनेक अहवालांनुसार, अशी प्रकरणे भारतात पाहिली गेली आहेत, ज्यामध्ये रुग्णाला दोन किंवा अधिक वेळा कोविड -19 झाला आहे.

(वाचा – Winter Tips: रिकाम्या पोटी गुळाचे पाणी पिणे गुणकारी, बॉडी डिटॉक्ससह होतील हे ५ फायदे)

​फेस मास्कला हलक्यात घेऊ नका

ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटचे संक्रमण रोखण्यासाठी फेस मास्क जरूरी आहे. घरातून बाहेर निघाल्यावर फेस मास्क घालणे गरजेचे आहे. जर तुमची तब्बेत बिघडली असेल तर घरातही मास्क लावणे गरजेचे आहे. तसेच कोविड-१९ ची टेस्ट करूया.

हेही वाचा :  बीडमध्ये बहिण भावाचं मनोमिलन; निवडणुक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?

(वाचा – कोरोनाच्या ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंटवर हा काढा ठरेल रामबाण उपाय, आयुर्वेदातील ५ फायदे))

ही काळजी घेणे गरजेचे आहे

  • शक्य असल्यास, इतर राज्ये आणि देशांमध्ये प्रवास करणे टाळा.
  • सामाजिक अंतर पाळा.
  • साबणाने हात चांगले धुवा.
  • आजारी असताना वेगळे करा.
  • गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
  • पार्टी किंवा कार्यक्रमांना जाऊ नका.

(वाचा – Papaya Water Benefits: रिकाम्यापोटी पपईचे पाणी पिण्याचे अनेक फायदे, कॅन्सर आणि मधुमेह राहिल कंट्रोलमध्ये)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …