Sanjay Raut : ठाकरे गट आक्रमक, नागपुरात येऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा घोटाळा उघड करु – संजय राऊत

Sanjay Raut On CM Eknath Shinde Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे.  (Maharashtra Politics News) नागपुरात येऊन घोटाळा उघड करु, असा इशाराच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांवरचे घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. यासंदर्भातली कागदपत्र केंद्रीय तपास यंत्रणांकडे पाठवली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. भूखंड घोटाळ्याच्या या सर्व प्रकारावर अण्णा हजारे गप्प का?, असा सवालही त्यांनी विचारला आहे. शिंदेंच्या घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस सारवासारव करत आहेत. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक असल्याची टीकाही राऊत यांनी केलीय. (Political News)

’50 खोक्यांसाठी एसआयटी स्थापन करा’

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एसआयटी स्थापन करण्यावरुन शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 40 आमदारांना 50 खोके देऊन फोडण्यात आलं, त्या व्यवहारावर एसआयटी स्थापन करा, अशी मागणी राऊतांनी केली आहे. शिंदे सरकारकडून सत्तेचा आणि पदाचा दुरुपयोग होत आहे, असा आरोप केला आहे.

हेही वाचा :  viral: बांधकाम कामगाराचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल चकित...Video एकदा पाहायलाच हवा

बदनामी करण्याचं शस्त्र वापरुन खच्चीकरणाचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप राऊत यांनी केला. आम्ही सगळ्या तपासांना सामोरं जाऊ पण तुम्ही तोंडावर पडाल असा इशारा राऊतांनी सरकारला दिलाय. नाईट लाईफला विरोध करणारे आशिष शेलार कुठे आहेत असा सवालही राऊतांनी विचारलाय. हे दुतोंडी नाग असून दोन्ही बाजुंनी वळवळतात या शब्दांत राऊतांनी शेलारांवर हल्ला चढवला. 

आम्ही सर्व प्रकारच्या चौकशींना सामोरे जाऊ – राऊत

पन्नास खोक्यांसाठी एसआयटी स्थापन करा. उठसूट एसआयटी स्थापन करायची. पोलिसांना काही कामच ठेवायचं नाही. सत्तेचा यंत्रेणाचा गैरवापर होत आहे. आम्ही सर्व प्रकारच्या चौकशींना सामोरे जाणार आहोत. बदनामी हे शस्त्र वापरतं आहेत. शिवसेना या अग्निदिव्यातून बाहेर पडेल. अधिक उजळून बाहेर पडू, असा विश्वास  संजय राऊत  यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने सरकार स्थापन’

मुख्यमंत्र्या घोटाळा बाहेर काढणार आहोत.आम्ही दोन दिवसात नागपुरात जातोय अनेक विषय समोर आणू. उठसूट एसआयटी स्थापन करायची. पोलिसांना काही कामच ठेवायचं नाही. काहीही आरोप करायचे. बदनामी करायची. बदनामी  हे शस्त्र वापरायचं. पण आम्ही बदनामीला घाबरत नाही. महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने सरकार स्थापन झाले आहे. अण्णा हजारे सरकारला का जाब विचारत नाहीत. अचानक कुठे गायब झाले ते. समाजमाध्यमांच्या माध्यमातून लोकांनी सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :  "मोदींचं नेतृत्व या देशात सर्वात उंच, पण भाजपाने...," संजय राऊत स्पष्टच बोलले | Shivsena Sanjay Raut on PM Narendra Modi BJP sgy 87

मुख्यमंत्र्यांवरील आरोप हे गंभीर आहेत. 110 कोटींचे भूखंड 2 कोटी रुपयांना आपल्या मर्जीतील लोकांना दिले गेले. एकनाथ शिंदे यांनी गरिबांचे 16 भूखंड बिल्डरांच्या घशात घातले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस शिंदे यांच्या घोटाळ्यावर सारवासारव करत आहेत, असाही आरोप राऊत यांनी केला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …