आमदार पडळकर यांच्या बंधुनी केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक

Miraj bandh today : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांचे बंधू आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांनी काल सांगली जिल्ह्यातल्या (Sangli district) मिरजमध्ये (Miraj bandh) केलेल्या पाडकामाविरोधात आज मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra Political News) पडळकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री काही दुकाने आणि हॉटेलं पाडली.  त्याचा निषेध म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, आरपीआयसह विविध सामाजिक संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. (Shops and hotels have been demolished with the help of JCB in Miraj town of Sangli)

आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून भावाची पाठराखण 

दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भावाची पाठराखण करत सर्व आरोप फेटाळून लावले. ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्लॉटवर झालेले अतिक्रमण काढून घ्यावं महापालिकेनेच सांगितल्याचा दावा आमदार पडळकर यांनी केला आहे. आता आजच्या महाविकास आघाडीच्या बंदला सर्वसामान्य मिरजकर कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे. 

हेही वाचा :  Lalu Prasad Yadav health : लालू प्रसाद यादव आहेत ‘या’ 8 भयंकर आजारांनी ग्रस्त, अवस्था झालीये गंभीर, करावं लागलं हॉस्पिटलमध्ये भरती..!

मध्यरात्री दुकानं आणि हॉटेलं जेसीबीच्या सहाय्याने पाडलीत

मिरज शहरात काल मध्यरात्री दुकानं आणि हॉटेलं जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी हे पाडकाम केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या पाडकामप्रकरणी पोलिसांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल केलाय. 

मध्यरात्री दोन हॉटेलं, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल्सचं ऑफिस, एक घर आणि एक पानपट्टी अशा 7 मिळकती तोडण्यात आल्या. हजारो लोकांसह जागेचा ताबा घेण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर आले होते असा आरोप नागरिकांनी केलाय. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 

ब्रह्मानंद पडळकर यांच्यासहीत 100 जणांवर गुन्हा दाखल 

सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासहीत 100 जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, लोकांना मारहाण केली, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. या प्रमाणे 12 कलमा द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जेसीबी मशीन जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान गोपीचंद पळकरांनी भावावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 

हेही वाचा :  ट्यूब टॉप व शॉर्ट्समध्ये तारा सुतारियाने फ्लॉंट केला सडपातळ बांधा, कातील अदा बघून इंटरनेचा पारा गेला सर्रकन वर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …