Lalu Prasad Yadav health : लालू प्रसाद यादव आहेत ‘या’ 8 भयंकर आजारांनी ग्रस्त, अवस्था झालीये गंभीर, करावं लागलं हॉस्पिटलमध्ये भरती..!

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचा मुलगा तेजस्वी यादवने (tejaswi yadav) सांगितले की त्यांची क्रिएटिनिन पातळी 5.9 वर पोहोचली आहे. क्रिएटिनिन (Creatinine) हे एक बिनकामाचे उत्पादन आहे जे शरीराच्या स्नायूंच्या सामान्य बिघाडातून जन्मास येते. रक्तातील त्याचे प्रमाण वाढल्यामुळे किडनी निकामी होण्यासारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असतो.

तेजस्वीने सांगितले की, लालू जेव्हा रांचीमध्ये होते तेव्हा त्यांची क्रिएटिनिन पातळी 4.5 होती. दिल्लीत चाचणी झाल्यानंतर हे प्रमाण वाढून 5.1 झाले. आता ते 5.9 वर पोहोचले. पुन्हा तपासणी केली असता संसर्ग वाढत आहे. तुरुंगात लालूंची तब्येत बिघडल्यानंतर ते प्रथम रांची येथील RIMS मध्ये भरतीसाठी गेले आणि त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले. चला तर जाणून घेऊया लालूंना कोणत्या आजाराने ग्रासले आहे आणि सध्या त्यांची प्रकृती कशी आहे. (फोटो साभार: istock by getty images)

हेही वाचा :  घाण आणि कमकुवत नसांना साफ करते हे एक चमत्कारी फळ

क्रिएटिन वाढल्याने हालत झाली गंभीर

लालूंच्या वाढलेल्या क्रिएटिनिन लेव्हलमुळे त्यांच्या किडनीने काम करणे बंद केल्याचे सांगितले जात आहे. RIMS चे संचालक डॉ कामेश्वर प्रसाद यांनी सांगितले की, लालूंना किडनी, हृदयासोबतच इतरही समस्या आहेत. त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला कारण त्यांची क्रिएटिनिन पातळी 4.6 वर पोहोचली होती, ज्यामुळे किडनी निकामी होऊ शकली असती.

(वाचा :- Yoga for Headache : औषधांमधून व्हा मुक्त, 150 प्रकारच्या डोकेदुखींना मुळापासून संपवतात ‘ही’ 12 योगासने आणि टेकनिक्स..!)

क्रिएटिन लेव्हल काय आहे?

सोप्या भाषेत सांगायचे तर, क्रिएटिनिन हा एक वाईट पदार्थ आहे, जो रक्तामध्ये जमा होतो. त्याची पातळी वाढणे हे तुमचे वय, लिंग आणि शरीराच्या आकारावर अवलंबून असते. रक्तातील त्याचे प्रमाण वाढल्यामुळे किडनी निकामी होण्यासारख्या अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असतो.

(वाचा :- पिझ्झा-बिअरच्या नादात 110 किलोवर पोहचलं होतं वजन, ‘ही’ खास ट्रिक वापरून घटवलं तब्बल 30 किलो वजन..!)

क्रिएटिन लेव्हल किती असावी?

ब्रिटीश मेडिकल जर्नलनुसार, सीरम क्रिएटिनिनची सामान्य संदर्भ श्रेणी पुरूषांसाठी 60 ते 110 मायक्रोमोल्स प्रति लिटर (mCmol/l) किंवा 0.7 ते 1.2 मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) आणि 45 ते 90 एमसीमोल/लीटर इतकी आहे. तर हेच प्रमाण महिलांसाठी 0.5 ते 1.0 मिलीग्राम / डीएल) इतके आहे.

हेही वाचा :  शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा, मग राष्ट्रवादीच्या का नाही?

(वाचा :- Piles home treatment : भयंकर अवस्थेत पोहचलेला मुळव्याधही होऊ शकतो झटक्यात बरा, स्वयंपाकघरातील ‘या’ 4 गोष्टी ठरतील रामबाण..!)

एकाचवेळी अनेक गंभीर आजारांनी पिडीत

यापूर्वी डायलिसिसमुळे त्यांची जामिनावर सुटका झाली होती. लालूंना उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचा जुना आजार, दीर्घकालीन हृदयविकार, कमजोर रोगप्रतिकारकशक्ती, डोळे कमजोर होणे, मुतखडे (kidney stones), शरीरात रक्ताची कमतरता, युरिक अॅसिड वाढणे इत्यादी गंभीर आजारांनी ग्रासले असून हृदयाच्या आजारासाठी त्यांची व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट सर्जरी देखील करण्यात आली आहे. लालू यांना लघवी करताना त्रास होत होता.

(वाचा :- Roti For Weight Loss : पोट व कंबरेवरची चरबी कमी करते ‘या’ पिठापासून बनलेली चपाती, 1 आठवड्यातच दिसू लागेल कमालीचा फरक!)

किडनी खराब होण्याची लक्षणे

डॉक्टरांच्या मते, लालू यादव यांची सर्वात गंभीर समस्या किडनीशी संबंधित आहे. त्यांची फक्त 20 ते 50 टक्के किडनीच व्यवस्थित काम करत आहे. किडनी निकामी होण्याची काही संकेत देणारी लक्षणे येथे दिली आहेत ज्याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नये.

  1. विनाकारण वजन कमी होणे
  2. घोट्याला आणि हातपायांवर सूज येणे
  3. अति थकवा
  4. लघवीतून रक्त पडणे
  5. निद्रानाश किंवा झोपण्यात अडचण येणे
  6. त्वचेत जळजळ जाणवणे किंवा खाज सुटणे
हेही वाचा :  रशियाला इशाऱ्या देणारी नाटो बॅकफूटवर, ही जबरदस्त मोठी खेळी

(वाचा :- Covid19 4th wave : बापरे सावधान.. लवकरच येणार चौथी लाट? चीनमध्ये Omicron BA.2 मुळे पुन्हा लागला लॉकडाउन, ‘ही’ आहेत 10 नवी लक्षणे..!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …