94 किलो मुलाने ही साधी घरगुती ट्रिक करून घटवलं 25 किलो वजन,दिसू लागला हिरोसारखा Slim-Trim

Weight Loos Belly Fat Burn Foods : वाढलेले वजन ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. जास्त वजन असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शक्य तितक्या लवकर वजन कमी करायचे असते आणि यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. ज्यात आहार, व्यायाम आणि अनेक सप्लिमेंट्सचा समावेश असती. आज आम्ही तुम्हाला गाझियाबादमधील एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे वजन एकेकाळी 94 किलो होते.

जास्त वजनामुळे त्याला आवडीचे कपडे देखील घालता येत नव्हते आणि अनेकवेळा त्याला इतरांसमोर आपल्या लठ्ठपणामुळे लाज वाटायची. हाच तो ट्रिगर पॉईंट ठरला आणि त्याने ठरवले की काहीही करून वजन कमी करायचेच. अखेर जबरदस्त इच्छाशक्ती, पॉपर प्लानिंग आणि प्रथिनेयुक्त शाकाहारी जेवण खाऊन त्याने आपले वजन तब्बल 25 किलोने कमी केले. चला जाणून घेऊ कशी होती त्याची वेटलॉस जर्नी!

  1. नाव – चर्चित वार्ष्णे
  2. व्यवसाय– सॉफ्टवेअर डेव्हलपर
  3. वय– 29 वर्षे
  4. उंची – 169 सेमी
  5. शहर– गाझियाबाद
  6. वाढलेले वजन– 94 किलो
  7. कमी केलेले वजन – 25 किलो
  8. वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – 10 महिने
    (Image Credit: TOI)

वेटलॉससाठी कोणत्या गोष्टीने केले मोटिव्हेट?

वेटलॉससाठी कोणत्या गोष्टीने केले मोटिव्हेट?

चर्चित वार्ष्णेने सांगितले की, जेव्हा मी हिवाळ्यात स्वत:साठी वुलन जॅकेट घेण्यासाठी गेलो तेव्हा मला माझ्या साईजचे जॅकेट खूप शोधूनही सापडले नाही. मला आवडलेल्या जॅकेटची साईज मला फिट बसत नव्हती. अशा परिस्थितीत माझ्याकडे फारसे पर्याय नव्हते आणि या घटनेनेच मला माझे वजन कमी करण्याची प्रेरणा दिली. आता ही परिस्थिती आहे पण उद्या वजन वाढले तर अजून गंभीर स्थिती निर्माण होईल ही भीती मनात आली व वेळीच मी वजन कमी करायचे ठरवले.

हेही वाचा :  नोरा फतेही डेटिंग करताना अजिबात करत नाही 'हे' काम

(वाचा :- जेवताना ही 2 कामं करणा-यांचं पोट कधीच होत नाही साफ व पचनक्रियेचे वाजतात 12, या 8 नियमांची घ्या कटाक्षाने काळजी)​

कोणता डाएट फॉलो केला?

कोणता डाएट फॉलो केला?
  1. नाश्ता – 1 ग्लास दूध आणि पीनट बटरसह दोन ब्राऊन ब्रेड.
  2. दुपारचे जेवण – भाज्या किंवा डाळीसह तीन रोट्या.
  3. रात्रीचे जेवण- 150 ग्रॅम पनीर, डाळ आणि सोबत एक रोटी
  4. प्री वर्कआउट मिल – एक कप ब्लॅक कॉफी
  5. व्यायामानंतरचे जेवण – हिरव्या पालेभाज्यांचा रस
  6. लो कॅलरी रेसिपी – डोसा

(वाचा :- Cholesterol Medicine शास्त्रज्ञांचा खुलासा, रक्तातील 60% कोलेस्ट्रॉल साईड इफेक्टविना गाळून बाहेर फेकतो हा उपाय)​

कोणत्या वर्कआउटने कमी केले वजन?

कोणत्या वर्कआउटने कमी केले वजन?

चर्चित वार्ष्णेने म्हणतो की, मी वजन कमी करण्यासाठी 2 ते 3 किमी धावायचो. हळुहळू ती लिमिट वाढवून मी ५ किमी एवढी केली. स्क्वॉट्स, लंग्ज, पुशअप्स, क्रंचेस आणि योग यासारखे बॉडी वेट व्यायाम माझ्या दैनंदिन जीवनाचा आता एक भाग झाले आहेत. चर्चितच्या मते वजन कमी करणे ही एक मॅरेथॉन आहे आणि हेच त्याच्या फिटनेसचे रहस्य आहे.

(वाचा :- फुफ्फुसे आणि घशात धूळ साचल्याने होतो कॅन्सर आणि अस्थमा, या 2 उपायांनी सर्व घाण कचरा फेकला जातो मुळापासून बाहेर)​

हेही वाचा :  KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत भरती, ग्रॅज्युएट ते MBBS सर्वांसाठी नोकरी, 60 हजारपर्यंत पगार

लठ्ठपणामुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

लठ्ठपणामुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?

चर्चित म्हणतो की, आपले शरीर हे एक मंदिर आहे. म्हणूनच आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला हवे ते कपडे घालता न येणे आणि आपल्या वाढलेल्या बेढब आणि लठ्ठ शरीराची लाज वाटण्याची भावना खूप वाईट आहे. ही भावना खूप निराश करते आणि आयुष्यावरचा विश्वास देखील उडून जातो. आपण काहीच करू शकत नाही अशी फिलिंग निर्माण होते.

(वाचा :- बापरे, मेंदूपासून हाडांपर्यंत अनेक मोठ्या अवयवांचा भुगा करते सेरोटोनिनची कमी,पोट साफ होण्यासाठी खा हे 5 पदार्थ)​

लाइफस्टाइल मध्ये काय बदल केले?

लाइफस्टाइल मध्ये काय बदल केले?

वजन कमी करण्यासाठी, चर्चितने केवळ हेल्दी फूडचेच सेवन केले नाही तर दररोज सुमारे 14 तास उपवास देखील केला. ज्याचा मोठा परिणाम त्याला अवघ्या काही दिवसांतच दिसून आला. शिवाय आपण योग्य मार्गावर असल्याचे जाणवले.
(वाचा :- Satish Kaushik यांनी काल केला होळीचा आनंद साजरा व आज हार्ट अटॅकने मृत्यू, वाढलेलं वजन ठरलं हार्ट अटॅकचं कारण?)​

वेटलॉस मधून काय शिकायला मिळाले?

वेटलॉस मधून काय शिकायला मिळाले?

जीवनशैलीत छोटे आणि कायमस्वरूपी बदल केल्याने शेवटी मोठे यश मिळते, असे चर्चित म्हणतो. ही शिकवण त्याला त्याच्याच वेटलॉस जर्नीमधून मिळाली. चर्चित म्हणतो हीच गोष्ट फॉलो केल्याने आज माझे आयुष्य आनंदी आणि निरोगी झाले आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांना मी सांगू इच्छितो की वजन कमी करण्यासाठी शाकाहारी आहारच घ्या.

हेही वाचा :  Rohit Pawar : 'पार्थचा भाऊ म्हणून बदला घेणार', अजितदादांवर टीका करत रोहित पवारांनी मावळात उचलला विडा

(वाचा :- किडनी 90% पेक्षा जास्त सडल्यास दिसतात ही घातक लक्षणं, रक्तातील घाण बाहेर फेकण्यासाठी करावीच लागते ही प्रक्रिया)​

हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप : लेखकासाठी जे कार्य केले ते आपल्यासाठी आवश्यक नाही. त्यामुळे या लेखात नमूद केलेल्या डाएट-वर्कआउटचे आंधळेपणाने पालन करणे टाळा आणि तुमच्या शरीरासाठी कोणते चांगले काम करते ते शोधा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …