101 किलोच्या मुलाने Weight Loss साठी लढवली ही शक्कल, सिक्स पॅक्समध्ये बदलली शरीरातील सर्व चरबी, मौल्यवान टिप्स

हेल्दी लाईफस्टाईलसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. पण अनेकांना या गोष्टीची जाणीव तेव्हा होते जेव्हा ते इतरांना फिट असलेलं पाहतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकीच एक असाल, तर अक्षय देसाईचा हा वजन कमी करण्याचा प्रवास तुम्हाला नक्कीच तुमचे वजन कमी करण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो.अक्षय देसाई एका आयटी कंपनीत काम करतो. हेल्थपेक्षाही नोकरीला जास्त प्राधान्य दिल्याने तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ शकला नाही, त्यामुळे त्याचे वजन 101 किलोपर्यंत वाढले होते.

पण आपली लाईफस्टाईल सुधारून त्याने केवळ 27 किलो वजनच कमी केले नाही तर सिक्स पॅकही बनवले. या प्रवासात त्याने झोप आणि खाण्याच्या सवयी तर सुधारल्याच पण त्याला वेट ट्रेनिंगचे चमत्कारिक परिणाम देखील दिसून आले. कशी होती त्याची वेट लॉस जर्नी? चला जाणून घेऊया. (फोटो साभार – TOI)

हा होता टर्निंग पॉइंट

अक्षय सांगतो की, “एके दिवशी फोन स्क्रोल करत असताना मला एका फिटनेस अॅपवर वेट टान्सफॉर्मेशनचे फोटोज दिसले. या फोटोंनी मला स्वतःला आरशात पाहण्यास भाग पाडले आणि तेव्हाच मला समजले की मी माझ्या शरीराकडे आणि माझ्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष केले आहे. मला माझा कॉलेजचा काळ आठवला जेव्हा मी खूप फिट होतो असायचो. पण आता माझे वजन तब्बल 101 किलोवर पोहचले होते आणि पोटावरील चरबीही खूप वाढली होती.”
(वाचा :- थंडीत सांध्याचा चिकटपणा सुकल्याने होते जीवघेणी गुडघेदुखी, या १५ भाज्या गुडघ्यातील ग्रीस वाढवून वेदना करतात दूर)

हेही वाचा :  Mumbai News : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावऱ्या दोन स्पर्धेकांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

वेट लॉस डाएट

अक्षय म्हणतो की, “मी 2 ग्रॅम प्रति किलोग्रॅम दराने कमी कॅलरी, हाय फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात केली. तसेच हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज 5 लिटर पाणी देखील प्यायचो.” याचा एक मोठा फायदा मला झाला आणि माझ्या वजनावर फरक दिसू लागला.”
(वाचा :- बापरे, नसांमध्ये कॉलेस्ट्रॉल साचल्यास येतो हार्ट अटॅक,नसा व आतड्यातून कोलेस्ट्रॉल झटक्यात बाहेर फेकतात हे उपाय)

​वर्कआउट प्लान काय होता?

अक्षय म्हणतो की, “मी माझ्या सुरुवातीच्या फिटनेसचे क्रेडीट होम वर्कआउटला देतो. या दरम्यान, माझ्या बॉडीची अॅक्टिव्हीटी वाढवण्यासाठी मी दररोज चालत असे. त्यानंतर मी हळूहळू जिममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू केले आणि बॉडी वेट स्ट्रेंथ ट्रेनिंग ट्राय करून आठवड्यातून सहा वेळा व्यायाम सुरु केला. तसेच दररोज, मी 2000 रोप स्किप आणि 10,000 स्टेप्स वॉकिंग देखील करायचो.”

(वाचा :- Remedies for Cough : घसा व छातीतील जमा कफ बाहेर फेकून कोरडा व ओला खोकला होईल कायमचा छुमंतर, फक्त करा हे 6 उपाय)

वजन वाढले कसे?

याचे उत्तर देताना अक्षय म्हणतो की, “माझी खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि आयटी जॉबमुळे माझे वजन नियंत्रणाबाहेर गेले होते. कारण कामाच्या ताणामुळे मी खूप खाऊ लागलो होतो. तसेच, मी वर्कआउट करण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. हा तो काळ होता जेव्हा मी आरोग्यापेक्षा नोकरीला जास्त प्राधान्य देत होतो. तिचं माझी आयुष्यातली मोठी चूक ठरली. पण मला आनंद आहे की वेळीच मी त्या दुष्परिणामांमधून बाहेर आलो.”

हेही वाचा :  फॉर्मल ब्लेझर घ्यायला गेल्यावर लठ्ठपणामुळे दुकानदाराने उडवली खिल्ली, दारू सोडून केले 50 Kg Weight Loss

(वाचा :- Lung Cancer Symptoms : फुफ्फुसांत दिसली ही लक्षणं तर समजून जा झालाय लंग कॅन्सर, फक्त 5 महिनेच जगण्याचे चान्सेस)

फिटनेस सिक्रेट

“मी असा व्यक्ती आहे ज्याला खायला खूप आवडतं. आजच्या भाषेत बोलायचं तर मी खूप फुडी आहे. पण लॉकडाऊनच्या काळात मी माझ्या आरोग्याचा खूप विचार केला. त्यानंतर माझ्या लक्षात आले की खाण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन आरोग्य पूर्वपदावर आणता येते. तेव्हा मी फक्त घरी बनवलेले अन्न खायला लागलो आणि त्याचा खूप चांगला परिणाम मला दिसून आला. तुम्ही आज जी माझी बॉडी पाहताय त्यामध्ये घरच्या अन्नाचे योगदान मोठे आहे.”

(वाचा :- Sleep Fact : टाचणीचा आवाजही गाढ झोपेतून करत असेल तुम्हाला जागं तर व्हा सावध, कधीही होऊ शकतात हे 4 गंभीर आजार)

​लठ्ठपणा कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये काय बदल केले?

शेड्युलमध्ये केलेल्या बदलांबद्दल बोलताना अक्षय म्हणतो, ‘फिटनेससाठी मी दररोज क्वांटिफाइड न्यूट्रिशन आणि 8 तास चांगली झोप घ्यायला सुरुवात केली. याशिवाय, माझ्या कामात व्यस्त असूनही, मी घरी बनवलेले जेवण आणि नियमित व्यायाम हा माझ्या सवयीचा भाग बनवला.”

हेही वाचा :  एसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारने दिला अखेरचा अल्टीमेटम

(वाचा :- सकाळी उठून ही कामे केल्याने रॉकेटच्या स्पीडने धावतो मेंदू, वयाच्या शंभरीपर्यंत स्मरणशक्तीला धक्काही लागत नाही)

वाढलेल्या वनाचे दु:ख काय होते?

अक्षय म्हणतो की, लठ्ठपणाचा बळी झाल्यानंतर मी स्वतःच स्वत:च्या शरीराला स्वीकारू शकत नव्हतो. यासोबतच मला शारीरिक हालचाल करतानाही खूप त्रास व्हायचा, ज्यामुळे मी आतून कोलमडलो होतो. मला माझे फिट शरीर परत हवे होते आणि शेवटी ते मी मिळवलेच.”

टीप: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून याममध्ये सांगितलेला वेट लॉस आणि डायट प्लान तुम्हाला कामी येईलच असे नाही. त्यामुळे योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्या आहारात बदल करा आणि व्यायाम करा.

(वाचा :- भारतीय एअरपोर्टवरील तब्बल 200 प्रवाशांत सापडला Omicron BF.7, जगायचं असेल तर दिवसभर करा ही कामे – आयुष मंत्रालय)

हा लेख इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …