अदिती राव हैदरी करतेय सिद्धार्थला डेट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

Aditi Rao Hydari And Siddharth: अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) या दोघांच्या नात्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने अदितीच्या वाढदिवसाला एक खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सिद्धार्थ हा अदितीला डेट करत आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. आता सिद्धार्थ आणि अदितीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुंबईमधील एका हॉटेलमधून अदिती आणि सिद्धार्थ हे बाहेर पडत आहेत. हे दोघे त्या रेस्टोरंटमध्ये डिनर डेटसाठी गेले होते, असंही म्हटलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अदिती ही पिंक कलरचा शर्ट आणि ब्लॅक ट्रॅक पँट अशा लूकमध्ये दिसत आहे तर सिद्धार्थ हा ग्रेट टीशर्ट आणि निळी पँट अशा कूल लूकमध्ये दिसत आहे. सिद्धार्थ आणि अदितीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता दोघांच्या डेटिंगबाबतची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

पाहा व्हिडीओ


सिद्धार्थनं शेअर केली होती खास पोस्ट

सिद्धार्थने अदितीच्या वाढदिवसाला एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजकुमारी, तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.” सिद्धार्थच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. 


‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेता सिद्धार्थला (Siddharth) विशेष लोकप्रियता मिळाली. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील त्याची मत मांडतो. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. तर अदिती ही लवकरच ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या वेब सीरिजमधील लूक काही दिवसांपूर्वी रिव्हिल करण्यात आला. 

हेही वाचा :  'Taarak Mehta Ka Ooltah Chashmah' यशस्वी होण्यात तारक मेहता यांच्या लेखणीचा मोलाचा वाटा

महत्वाच्या इतर बातम्या: 

Sanjay Leela Bhansali : 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संजय लीला भन्साळींची ‘हीरामंडी’ प्रेक्षकांच्या भेटीला



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …