राम गोपाल वर्मानं शेअर केलं ट्वीट; म्हणाला…

Ram Gopal Verma: सोशल मीडियावरील पोस्टमुळे  प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा  (Ram Gopal Verma) हा नेहमी चर्चेत असतो. ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारा राम गोपाल वर्मा हा वेगवेगळ्या विषयांवरील ट्वीट शेअर करत असतो. राम गोपाल वर्मानं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं सांगितलं की, काही चित्रपट निर्मात्यांचा गट हा प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या हत्येचा कट रचत आहेत. राम गोपाल वर्माच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 

राम गोपाल वर्माचं ट्वीट

राम गोपाल वर्मानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘एसएस राजामौली सर कृपया तुमची सुरक्षा वाढवा. तुमच्या यशाला पाहून जळणाऱ्या काही भारतीय चित्रपट निर्मात्यांनी तुम्हाला जीवे मारण्यासाठी एक गट तयार केले आहे, ज्याचा मी देखील एक भाग आहे. मी हे रहस्य उघड करत आहे कारण मी चार पॅक ड्रिंक घेतले आहेत.’ 

news reels New Reels

राम गोपाल वर्मानं आणखी एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, ‘यू के आसिफ ज्याने मुघल ए आझम बनवला, रमेश सिप्पी ज्यांनी शोलेची निर्मिती केली, यासोबतच आदित्य चोप्रा, करण जोहर आणि  भन्साळी या सर्वांना एसएस राजामौली यांनी मागे टाकले आहे. मला तुमच्या पायाचं चुंबन घ्यायचे आहे.’

काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्माचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अभिनेत्रीचे पाय हातात धरून राम गोपाल वर्मा हा जमिनीवर बसलेला दिसत आहे. या फोटोमुळे राम गोपाल वर्माला अनेकांनी ट्रोल केलं. 

हेही वाचा :  प्रतिक बब्बर पुन्हा पडलाय प्रेमात; शेअर केली खास पोस्ट

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …