सुधीर वर्मानं केली आत्महत्या; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा

Sudheer Varma Suicide: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुधीर वर्मानं (Sudheer Varma) आत्महत्या केली आहे. सुधीरनं अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. सुधीरनं  23 जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. सुधीर वर्माच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून सुधीर हा मानसिक तणावाचा सामना करत होता, असं म्हटलं जात आहे. सुधीरच्या निधनाने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

सुधीर वर्मासोबत काम केलेला अभिनेता सुधाकरनं सोशल मीडियाद्वारे सुधीरला श्रद्धांजली वाहिली. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘सुधीर! भावा,  तू खूप चांगला मुलगा होतास. तू या जगात नाहीयेस, हे खरं वाटतं नाहीये. ओम शांती’

अभिनेत्री चांदिनी चौधरीनं देखील सुधीर वर्मासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन तिनं लिहिलं, ‘सुधीर तुझ्या जाण्यानं मन दुखावले आहे.  तू एक चांगला सहकलाकार आणि मित्र होतास. आम्हाला तुझी आठवण येईल. माझ्या मित्रा, तुझ्या आत्म्याला शांती लाभो.’

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्वामी रा रा’ या चित्रपटामधून सुधीरनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच त्यानं  2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या Kundanapu Bomma या चित्रपटात देखील काम केले. सेकंड हँड या तेलुगू चित्रपटामध्ये सुधीरनं काम केलं. या चित्रपटांमुळे सुधीरला विशेष लोकप्रियता मिळाली. सुधीर हा तेलुगू चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता होता. शूट आउट अॅट अलॅर या वेब सीरिजमध्ये देखील त्यानं काम केलं. 

हेही वाचा :  IFFI 2022 : 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 24 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …