सोशल मीडियावर राखीच्या गर्भपाताच्या चर्चा; प्रतिक्रिया देत म्हणाली…

Rakhi Sawan : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत  (Rakhi Sawant) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) काही दिवसांपूर्वी लग्न केलं. राखी ही प्रेग्नंट होती आणि तिचा गर्भपात झाला आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता या चर्चेवर राखीने प्रतिक्रिया दिली आहे. राखी आणि आदिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रेग्नन्सी आणि गर्भपाताबाबत पसरणारी बातमी ही खोटी आहे, असं सांगितलं आहे. 

‘राखीने आपल्या प्रेग्नन्सीबाबत बिग बॉस मराठी या शोमध्ये घोषणा केली होती आणि आता तिचा गर्भपात झाला आहे’, अशी पोस्ट एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली होती. त्यानंतर आता राखी आणि आदिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही बातमी खोटी आहे, असं सांगितलं. राखीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं की, ‘ही खोटी बातमी आहे. प्लीज अशी खोटी माहिती पसरवू नका.’

प्रेग्नन्सी आणि गर्भपाताच्या चर्चेवर राखी म्हणाली…

एका मुलाखतीमध्ये देखील राखीने प्रेग्नन्सी आणि गर्भपाताच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “गर्भपात? तुम्ही वेडे आहात का?” त्यानंतर आदिलने सांगितलं “ही अफवा आहे, ही चुकीची माहिती आहे, असं काही झालेलं नाही.”

हेही वाचा :  श्रद्धा हत्याकांड प्रकरणाबद्दल केतकी चितळेची पोस्ट

पाहा राखीची पोस्ट


 

वैयक्तिक आयुष्यामुळे राखी चर्चेत

राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. आदिल खान हा बंगळुरुमध्ये राहतो. त्याचा कारचा व्यवसाय आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवस राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. 

बिग बॉस-14, नच बलिये, बिग बॉस-15 आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Rakhi Sawant: मुकेश अंबानी मदत करतायत; मुकेश अंबानी मदत करतायत; आईच्या तब्येतीबाबत राखी सावंतने दिली महत्त्वाची माहिती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …