आईच्या तब्येतीबाबत राखी सावंतने दिली महत्त्वाची माहिती

Rakhi Sawant: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ या नावाने ओळखली जाते. राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. राखीच्या आईवर उपचार सुरु आहेत. राखीने नुकतच मीडियासोबत चर्चा करताना सांगितलं की, “तिच्या आईच्या उपचारासाठी उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे तिची मदत करत आहेत.” 

नुकताच राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राखी ही तिच्या आईच्या प्रकृतीबाबत सांगाताना दिसत आहे. राखी म्हणाली की, “अंबानी जी हे माझी मदत करत आहेत. तसेच नामदेव जोशी देखील मदत करत आहेत. उपचारासाठी जिथे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत, ते कमी करण्यासाठी मला ते मदत करत आहेत. माझ्या आईला उपचारासाठी दोन महिने रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. माझ्या आईचं अर्ध शरीर पॅरालाईज्ड झालं आहे. तिच्या स्मरणशक्तीवर देखील परिणाम झाला आहे.”

राखीच्या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केली आहे. ‘राखी, काळजी करु नको, तुझी आई लवकर बरी होईल’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. 

हेही वाचा :  उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी

पाहा व्हिडीओ

news reels New Reels


राखीने आदिल खान दुर्रानीसोबत बांधली लग्नगाठ

राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली. आदिल खान हा बंगळुरुमध्ये राहत होता. त्याचा कारचा व्यवसाय आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बिग बॉस या शोमुळे राखीला लोकप्रियता मिळाली. राखी तिच्या विनोदी वक्यव्यामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखीला बिग बॉस-14 शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Rakhi Sawant: लग्नाच्या चर्चेवर अखेर आदिलनं सोडलं मौन; म्हणाला, ‘हो, मी राखीसोबत लग्न केलंय, पण सध्या…’



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …