उर्फी जावेद-चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी

Sushma Andhare: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)आणि अभिनेत्री   उर्फी जावेद  (Urfi Javed) यांचा सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्या ट्वीटला उर्फीनं प्रत्युत्तर दिलं होतं. आता ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो.’ असं या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिलं. 

सुषमा अंधारे यांनी कंगना रनौत, अमृता फडणवीस आणि केतकी चितळे यांचे काही फोटो शेअर केले. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,   ‘मी साडी नेसते.  मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट’ 

पुढे पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिले, ‘पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो.  कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते.’

हेही वाचा :  तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

live reels News Reels

 

‘अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी?  उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?  आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना ( म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना)  मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल.’, असंही या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिलं.

उर्फीच्या विरोधात मुंबईतल्या महिला सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. उर्फी ही सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत आहे. त्यामुळे समाजातील तरुण मुले मुली यांच्यावर प्रभाव पडत आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सक्त कारवाई करावी, अशी मागणी या सामाजित संस्थांनी केली आहे.  मराठा प्रतिष्ठान,गायत्री महिला सामाजिक विकास संस्था,पंचशील महिला सहकारी संस्था, संजीवनी महिला प्रतिष्ठान,साहियार महिला संस्था या संस्था उर्फीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

हेही वाचा :  Sumeet Raghavan : सुमीत राघवनने आरे आंदोलकांवर साधला निशाणा

Urfi Javed: ‘जेव्हा ती सापडेल, त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेन’; उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …