भारतीय क्रिकेटपटूंची अग्नीपरीक्षा आहे BCCI ची Dexa Test

नुकताच भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा अपघात झाला आणि संपूर्ण देश त्या अपघाताने (Rishabh Pant Accident) हादरला. प्रत्येक भारतीय आणि क्रिकेटप्रेमी तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना देत आहेत आणि त्याला शुभेच्छा देत आहेत. पण, आता क्रिकेट विश्वासाठी आणखी एक मोठी बातमी आली आहे. BCCI ने क्रिकेटमध्ये DEXA टेस्ट अनिवार्य केली आहे. बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की, यापुढे भारतीय खेळाडूंना यो-यो टेस्टसोबतच डेक्सा टेस्ट (Yo Yo test and Dexa Test) सुद्धा द्यावीच लागणार आहे.

यानंतरच प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त मानला जाईल. डेक्सा टेस्ट केल्याने खेळाडूंचा परफेक्ट फिटनेस दिसून येईल. साध्या इंडियन टीम या परिस्थितीमधून जात आहे आणि त्यांना येणाऱ्या काळात स्वत:ला ज्या पद्धतीने सिद्ध करून दाखवायचे आहे हे पाहता त्यांच्यासाठी ही टेस्ट निर्णायक ठरणार आहे. अनेक खेळाडूंचे भवितव्य देखील याच टेस्टवर अवलंबून आहे.

का केली जाते डेक्सा टेस्ट?

डेक्सा चाचणीला डेक्सा स्कॅन किंवा डीएक्सए चाचणी देखील म्हणतात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, ही हाडांची घनता चाचणी आहे, ज्यामध्ये हाडांची घनता (जाडी आणि ताकद) पाहिली जाते. ही चाचणी सांगते की शरीराच्या सांगाड्याच्या काही भागांच्या हाडांमध्ये किती खनिज असते. वैद्यकीय भाषेत याला कधीकधी डेन्सिटोमेट्री टेस्ट (DXA) असेही म्हणतात. खेळाडूंसाठी ही चाचणी महत्त्वाची आहे कारण यामुळे त्यांचे शरीर किती मजबूत आहेः हे दिसून येते. केवळ बाहेरून बॉडी बनवून फायदा नाही तर आतून सुद्धा खेळाडू फिट असला पाहिजे हेच या चाचणीवरून सिद्ध होते.

हेही वाचा :  राहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत सरकारवर केला प्रश्नांचा भडिमार

(वाचा :- Bloating Remedies: काहीही खाल्लं की लगेच फुगतं पोट? मग गॅस व अॅसिडीटी चुटकीसरशी दूर करतात या 5 गोष्टी, आजच करा)

डेक्सा टेस्ट म्हणजे काय?

क्रिकेटमध्ये, डेक्सा चाचणी खेळाडूंच्या हाडांची ताकद सांगते, ज्यामुळे दुखापत आणि फ्रॅक्चरचा धोका कमी केला जाऊ शकतो. ही एक्स-रे सारखीच इमेजिंग चाचणी आहे. ज्यामध्ये कमी प्रमाणात क्ष-किरण वापरले जातात. DEXA चे पूर्ण नाव ड्यूल-एनर्जी एक्स-रे एब्जोर्प्टियोमेट्री (Dual-Energy X-ray Absorptiometry) असे आहे. केवळ क्रिकेटच नाही तर अन्य खेळांसाठी देखील ही चाचणी मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक खेळांमह्द्ये तर ही चाचणी अनिवार्यच आहे. आता इंडियन क्रिकेट साठी ही चाचणी अनिवार्य केल्याने भारतीय क्रिकेट विश्वाचे रूप पालटणार आहे.

(वाचा :- Ayurvedic Tips: ही लहान लहान 5 कामं करणा-या लोकांना स्पर्शही करत नाही कोणतेच गंभीर रोग, कायम राहतात दीर्घायुषी)

डेक्सा टेस्ट कशी केली जाते?

  1. प्रथम व्यक्तीला विशेष एका डेक्सा एक्स-रे टेबलवर झोपवले जाते.
  2. त्यानंतर त्या व्यक्तीला योग्य त्या स्थितीत बसायला किंवा झोपायला सांगितले जाते.
  3. DEXA चाचणी बहुतेक वेळा हिप्स, मणक्याचे हाड किंवा मनगटाच्या हाडांवर केली जाते.
  4. नंतर DEXA मशीन इच्छित अवयवावर फिरवली जाते.
  5. डेक्सा चाचणीमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे एक्स-रे अतिशय कमी प्रमाणात वापरले जातात, जेणेकरून ही चाचणी सुरक्षित असावी.
  6. यानंतर, स्कॅनर रेडिओलॉजिस्टच्या स्क्रीनवर फोटो आणि आलेखांच्या माध्यमातून हाडांची घनता अर्थात बोन डेन्सिटी दाखवतो.
हेही वाचा :  मुंडेंचा गड, राजकारणाचा फड! पंकजा मुंडे मन मोकळं करणार?

(वाचा :- Anal Fissure Treatment: पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधापेक्षाही भयंकर आहे फिशर, हे 5 उपाय आरामाचं गुपित)

या लोकांची केली जाते डेक्सा टेस्ट

खेळाडूंचा फिटनेस जाणून घेण्यासाठी क्रिकेटमधील डेक्सा टेस्ट केली जाणार आहे. पण तुम्हाला एकून आश्चर्य वाटेल की सामान्य लोकांची सुद्धा डेक्सा टेस्ट केली जाते. ऑस्टियोपोरोसिस रोग शोधण्यासाठी डॉक्टर या चाचणीची शिफारस करतात. जेणेकरून रुग्णाला आवश्यक ते उपचार मिळू शकतील. यामुळे वेळीच निदान करून उपचार लार्ता येतात आणि त्या व्यक्तीचा वाढता आजार रोखता येतो. हाडांशी संबंधित अजून अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांसाठी डेक्सा टेस्ट करतात.

(वाचा :- Covid 4th Wave : भारतात जानेवारीला येणार करोनाची चौथी लाट? AIIMS डॉक्टरांचा सल्ला, पुढील 40 दिवस करा हे एक काम)

ऑस्टियोपोरोसिस म्हणजे काय?

वय आणि इतर कारणांमुळे हाडे त्यांची ताकद आणि घनता गमावतात. हाडांचे वस्तुमान कमी होण्याला ऑस्टियोपेनिया म्हणतात. जेव्हा ही स्थिती गंभीर होते आणि हाडे खूप पोकळ आणि कमकुवत होऊ लागतात, तेव्हा ऑस्टियोपोरोसिस हा आजार होतो. हा आजार झाल्यास अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि त्वरित उपचाराला सुरुवात करावी. यामुळे आजार अधिक जसर वाढण्यापासून रोखता येतो आणि येणारे संकट टळते.

हेही वाचा :  How To Lose Weight: ३०० किलो वजनाच्या माणसाने केले १६५ किलो वजन कमी

(वाचा :- सावधान..! कितीही भयंकर खोकला येऊदेत, पण हे नाव असलेलं Cough Syrup चुकूनही पिऊ नका, आतापर्यंत 18 लोकांचा मृत्यू)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …