राहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत सरकारवर केला प्रश्नांचा भडिमार

नवी दिल्ली : Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. दोघांनी एकच व्हिडिओ शेअर करून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वरुण यांनी व्हिडिओ शेअर करत आपल्याच सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. यातून कुठेतरी युक्रेनच्या मुद्द्यावर दोघेही एकत्र असल्याचे दिसून येत आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनी तर प्रत्येक संकटात संधी शोधू नये, असे म्हटले आहे.

Operation Ganga झाला उशीर?

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मोदी सरकार ऑपरेशन गंगा  (Operation Ganga) चालवत आहे. तथापि, या ऑपरेशनमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारण रशिया आणि ब्रिटनच्या सैन्यांमध्ये सतत गोळीबार होत आहे. सरकारने उशिरा पाऊल उचलले. त्यामुळे भारतीय विद्यार्थी वेळेवर परत येऊ शकलेले नाहीत, असे विरोधकांना वाटते.

काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी या दिरंगाईबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर प्रभावी पावले उचलत नसल्याचा आरोप करत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, असे म्हटलेय. केंद्र सरकार त्यांच्या परतीसाठी काहीही करणार नाही, प्रभावी पावले उचलत नसल्याचे सांगितले. 

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपला आहे स्नायपर, तुम्ही शोधू शकता का?

योग्य वेळी निर्णय घेतला नाही?

राहुल गांधी यांचे चुलत भाऊ वरुण गांधी यांनीही त्यांच्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पीलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी यांनी सोमवारी सकाळी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर करताना म्हटलेय, योग्य निर्णय न घेतल्याने प्रचंड गोंधळात 15 हजारांहून अधिक विद्यार्थी अजूनही युद्धभूमीत अडकले आहेत. ठोस धोरणात्मक आणि मुत्सद्दी कारवाई करून त्यांना सुरक्षित परतणे हे त्यांच्यावर उपकार नसून ती आपली जबाबदारी आहे. प्रत्येक संकटात ‘संधी’ शोधता कामा नये, असे वरुण यांनी म्हटलेय. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …