घरात ‘या’ ठिकाणी ‘असे सेट करा Wi-Fi, इंटरनेट स्पीड कमी होणारच नाही, पाहा या ट्रिक्स

नवी दिल्ली: आजच्या काळात आपले जवळपास प्रत्येक काम इंटरनेटशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येकालाच आता इंटरनेटची आवश्यकता असते. मग ते ऑफिसचे महत्वाचे काम असू देत किंवा ऑनलाईन शॉपिंग, प्रत्येक कामासाठी इंटरनेटची गरज असते. अशा परिस्थितीत काही लोक मोबाईल डेटा वापरतात तर काही लोक वायफायचा वापर करतात. सहसा वायफायचा वेग मोबाईल डेटा पेक्षा चांगला असल्याने अनेक जण त्यालाच प्राधान्य देतात. पण, खरी अडचण तेव्हा येते. ज्यावेळी Wifi चा स्पीड देखील कमी व्हायला लागतो. असे झाल्यास अनेक महत्वाची कामं खोळंबतात. तुम्हाला देखील वाय फाय इंटरनेटचा स्पीड वाढवायचा असेल, तर या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या नक्की कामी येतील.

वाचा: पार्टी होणार धमाकेदार ! ५० % डिस्काउंटसह घरी आणा ‘हे’ Soundbar, सुरुवातीची किंमत १,२९९ रुपये

वायफाय चॅनेल Adjust करा:
वायफाय चॅनलमुळे इंटरनेट स्पीड कमी असल्याची तक्रर अपार्टमेंट किंवा कॉलनीत राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त आहे. जर तुमचा इंटरनेट स्पीड कमी असेल तर, सर्वप्रथम तुमचे वायफाय कोणत्या चॅनलवर आहे ते तपासा आणि ते अशा चॅनलमध्ये बदला, जे कमीत कमी वापरले जात आहे. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या वायफायचा वेग झटपट वाढवू शकाल. नेहमी वायर्ड कनेक्शन ठेवा: जेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी वायफाय खरेदी करत असाल, तेव्हा वायर्ड कनेक्शनसह वायफाय घेण्याचा प्रयत्न करा. वायर्ड कनेक्शन तुम्हाला वायरलेसपेक्षा चांगला स्पीड देईल. वायरलेस वायफाय राउटर वापरणे सोपे आहे. परंतु, वायर्ड कनेक्शनमुळे तुम्हाला चांगला वेग मिळेल.

हेही वाचा :  स्लो इंटरनेटचे टेन्शन विसरा, वाय-फाय स्पीड वाढविण्यात 'या' भन्नाट टिप्स करतील तुमची मदत, पाहा डिटेल्स

तुमचे राउटर ‘परफेक्ट’ ठिकाणी ठेवा: जेव्हा तुम्ही तुमच्या घरात वायफाय सेट करत असाल तेव्हा तुमचे वायफाय राउटर योग्य ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्या वायफाय राउटरचे सर्वोत्तम रिझल्ट्स हवे असतील, तर Wi-Fi राउटर कधीही, जिथे टीव्ही, ब्लूटूथ स्पीकर, स्वयंपाकघरातील कोणतेही उपकरण किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे तिथे ठेवू नका. ते सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात. अँड्राइड यूजर्स WiFi Analyzer अ‍ॅपच्या मदतीने वाय-फाय सिग्नल तपासू शकताता. तुम्ही अ‍ॅपमध्ये जाऊन नेटवर्क पाहू शकता. नेटवर्कची माहिती dBm म्हणून लिस्टेड असेल. तसेच, तुम्ही तुमच्या राउटर, मॉडेमला बंद करून पुन्हा सुरू करू शकता . यासोबतच ज्या डिव्हाइसला वाय-फाय कनेक्टेड आहे ते देखील रिस्टार्ट करू शकता.

वाचा: स्मार्टफोनच्या स्पीकरचा व्हॉल्युम कमी झालाय? मिनिटांत करा फिक्स, पाहा ‘या’ भन्नाट ट्रिक्स

वाचा: फोनच्या डिस्प्लेवर नेटवर्क सिम्बॉल ‘मिसिंग’ असेल तर, ‘असे’ करा मिनिटांत फिक्स, पाहा टिप्स

वाचा: Jio vs Airtel: डेटा-व्हॅलिडिटी सारखीच, तरीही किमतीत फरक, पाहा कोण देतय स्वस्तात बेनिफिट्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …