“माझी जीभ चोखतोस का?,” दलाई लामा यांचं भर कार्यक्रमात लहान मुलासह कृत्य, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Dalai Lama Kisses Child: तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांचे संपूर्ण जगभरात भक्त आहेत. आपली विधानं, भूमिका, निर्णय अशा अनेक गोष्टींमुळे ते नेहमी चर्चेत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दलाई लामा यांनी लहान मुलाला ओठांवर किस करतानाचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दलाई लामा यावेळी लहान मुलाला आपली जीभ चोखणार का? अशी विचारणा करत जीभ बाहेर काढताना दिसत आहेत. 

दलाई लामा लहान मुलाला ओठांवर किस करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यावेळी दलाई लामा यांनी मुलाला आपली जीभ चोखण्यास सांगितल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. 

व्हिडीओमध्ये लहान मुलगा दलाई लामा यांच्याप्रती आदर व्यक्त करत असताना सुरुवातीला ते त्याच्या ओठांवर किस करताना दिसत आहेत. यानंतर काही वेळाने ते त्याला आपली जीभ चोखणार का? अशी विचारणा करत जीभ बाहेर काढतात. 

हेही वाचा :  काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना संताप व्यक्त करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. 

जूस्ट ब्रोकर्स या महिलेने व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की “दलाई लामा यांनी बौद्ध कार्यक्रमात एका भारतीय मुलाला किस करत त्याच्या जीभेलाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ते चक्क माझी जीभ चोखणा का? अशी विचारणा करताना दिसत आहेत. पण त्यांनी असं का केलं असावं?”.

दरम्यान एका युजरने हे  घृणास्पद असून याचं स्पष्टीकरण दिलं जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …