Viral News: कोणती ट्रेन 10 मिनिटात लखनऊला पोहोचते? वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचा भावूक प्रश्न, सगळेच गहिवरले

Viral News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील एका 11 वर्षाच्या लहान मुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हंबरडा फोडणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ पाहून लोक गहिरवरले आहेत. वडिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनऊला नेण्यास सांगण्यात आलं होतं. पण पुढील 10 मिनिटात त्यांनी जीव गमावला. 

आजारी वडिलांच्या मृत्यूनंतर भावूक झालेल्या मुलाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना भावना अनावर होत आहे. व्हायरल व्हिडीओत हा चिमुरडा कोणती ट्रेन 10 मिनिटात लखनऊला पोहोचवते? अशी विचारणा करत आहे. 

लखीमपूर खेरी येथे राहणारे 54 वर्षीय रामचंद्र पांडे यांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडली होती. यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा रक्तदाब कमी असल्याने त्यांनी आपातकालीन कक्षात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली होती. यानंतर त्यांना तिसऱ्या माळ्यावरील कक्षात हलवण्यात आलं होतं. 

मात्र गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. पण रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी 1 पर्यंत एकही डॉक्टर तपासणीसाठी आला नाही. यादरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडली होती. डॉक्टरांनी आल्यानंतर तपासणी केली असता त्यांना लखनऊला घेऊन जाण्यास सांगितलं. पण पुढील 10 मिनिटांत त्यांनी जीव गमावला असं नातेवाईकांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा :  लग्नाला निघालेलं अख्खं कुटुंब संपलं, तुफान वेगाने धावणाऱ्या ट्रकने पिकअप व्हॅनला दिली धडक; 8 जण जागीच ठार

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आदर्शवर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याने केला. आपले वडील रुग्णालयात दाखल असताना रात्रीपासून एकही डॉक्टर तपासणीसाठी आले नसल्याचा आरोप त्याने केला आहे. 

“मृत्यूच्या 10 मिनिटं आधी आम्हाला त्यांना घेऊन लखनऊला नेण्यास सांगितलं. पण 10 मिनिटात लखनऊला घेऊन जाईल अशी कोणती ट्रेन आहे? आता माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. काहीही करुन त्यांनी परत आणा,” अशी आर्त हाक त्याने दिली आहे. 

11 वर्षाच्या आदर्शचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी याप्रकरणी अहवाल मागवला आहे. तसंच दोषींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …