…जेव्हा आई-वडिलांनी पाहिला ‘गंगूबाई काठियावाडी’; शांतनुनं सांगितली रिअॅक्शन

Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबतच (Alia Bhatt) अभिनेता शांतनु महेश्वरीने देखील (Shantanu Maheshwari) प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील आलिया आणि शांतनु यांचा रोमँटिक अंदाजामनं अमेकांचे लक्ष वेधले.  गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या पालकांनी रिअॅक्शनबद्दल शांतनुनं सांगितलं आहे. 

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामधून शांतनूनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर शांतनुच्या पालकांनी दिलेल्या रिअॅक्शनबद्दल शांतनु म्हणाला, ‘मी माझ्या आई वडीलांना सांगितले होते की मी या चित्रपटाचा एक भाग असणार आहे पण त्यांना मी अधिक माहिती दिली नव्हती. जेव्हा त्यांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांनी सर्वांना या चित्रपटाबद्दल सांगण्यास सुरूवात केली. अनेक लोकांकडे जाऊन त्यांनी हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. त्यांना हा चित्रपट खूप आवडला.’


संजय लीला भन्साळी यांच्याबाबत शांतनु म्हणाला, ‘मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी खूप एक्सायटेड होतो. मी ठरवले होते मला जेवढा वेळ स्क्रिन टाइम मिळेल त्या वेळेत मी खूप चांगलं काम करेन.’ शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज. सीमा पाहवा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 

हेही वाचा :  Raj Thackeray : आवडता बायोपिक कोणता? राज ठाकरे उत्तर देत म्हणाले...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …