आलिया भटच्या Gangubai Kathiawadi ची बॉक्स ऑफिसवर धमाल, 100 कोटी क्लबमध्ये समावेश

मुंबई : आलिया भटचा चित्रपट गंगूबाई काठियावाडी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. कोरोना महामारीनंतर थिएटर्समध्ये जबरदस्त कमाई करणारा हा तिसरा चित्रपट आहे. संजय लीला भन्सानी यांनी दिग्दर्शित केलेल्या गंगूबाई काठियावाडीला बॉक्स ऑफिसवर चाहत्यांचा शानदार प्रतिसाद मिळत आहे. आता हा चित्रपट 100 कोटी क्बलमध्ये सामील झाला आहे. हा सिनेमा जगभरातील चित्रपटप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आलिया भटने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये सामील झाल्याची माहिती खुद्द भन्साली प्रॉडक्शन हाऊसने दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सांगितलं की, गंगूबाई काठियावाडीने जगभरात 108.3 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. ही पोस्ट शेअर करताना एवढं प्रेम देण्यासाठी धन्यवाद असं म्हटलं आहे.


आलिया भटच्या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली होती. सिनेमाने पहिल्याच दिवशी 10.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. अनेक ठिकाणी नाईट शो नसल्यानेही चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. अनेक मोठ्या चित्रपटांना गंगूबाई काठियावाडी टक्कर देत आहे.

हेही वाचा :  Hrithik Roshan : ‘ट्विटर’ने बनवली जोडी! ‘अशी’ सुरु झाली हृतिक रोशन-सबाची प्रेमकहाणी...

Gangubai Kathaiwadi : आलिया नाही तर ‘या’ अभिनेत्रींना दिली होती ‘गंगूबाई काठियावाडी’ची ऑफर

गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’वर आधारित आहे. हा सिनेमा गंगूबाई यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतला आहे. गंगूबाईला तिच्या बॉयफ्रेण्डने 1000 रुपयांमध्ये मुंबईतील कामाठीपुरामध्ये विकलं होतं. यानंतर तिने महिलांसाठी लढण्यास सुरुवात केली. मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला यासाठी लढा दिला.

गंगूबाई काठियावाडीमध्ये आलियासोबत अजय देवगण, विजय राज, शांतनु माहेश्वरी आणि सीमा पाहवा, जिम सभ्र यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात सर्वांनीच दमदार अभिनय केला आहे. आलियाने साकारलेली गंगूबाई सगळ्यांनाच भावली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …