Gangubai Kathiawadi: आलियाच्या ‘या’सवयीमुळे वैतागला रणबीर कपूर, संजय लीला भन्साळींकडे केली तक्र

Gangubai Kathiawadi: आलियाच्या ‘या’सवयीमुळे वैतागला रणबीर कपूर, संजय लीला भन्साळींकडे केली तक्र

Gangubai Kathiawadi: आलियाच्या ‘या’सवयीमुळे वैतागला रणबीर कपूर, संजय लीला भन्साळींकडे केली तक्र

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) आता चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचा प्रीमियर बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला. आलियाचा हा चित्रपट खूप पसंत केला जात आहे. आता चाहतेदेखील हा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. बर्लिन फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचा प्रीमियर झाल्यानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिथे संजय लीला भन्साळी यांनी खुलासा केला की, आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) दिग्दर्शकाकडे तिची तक्रार केली होती.

संजय लीला भन्साळी यांनी खुलासा केला की, आलिया तिच्या व्यक्तिरेखेत इतकी रमली होती की, ती रणबीर कपूरसाठी डोकेदुखी ठरली होती. चित्रपटातील आलियाच्या अभिनयाबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, मला वाटते की ती तिच्या खऱ्या आयुष्यात आलियापेक्षा जास्त गंगूबाई बनली होती. ती घरात देखील गंगूबाईसारखी बोलायची, त्यामुळे तिचा प्रियकर रणबीरने तिची माझ्याकडे तक्रार केली होती.

रणबीरने ‘गंगूबाई’ स्टाईलमध्ये केले आलियाचे कौतुक!

हेही वाचा :  Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2'मधील पहिलं गाणं रिलीज, 'दफा कर'ची चाहत्यांमध्ये क्रेझ

‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रणबीर कपूरला त्याची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यानंतर रणबीरने ‘गंगूबाई स्टाईल’मध्ये नमस्ते म्हणत त्याची खास प्रतिक्रिया दिली. आलियानेही रणबीरचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, त्याला ‘बेस्ट बॉयफ्रेंड’ म्हटले आहे.

आलियाची ‘गंगूबाई स्टाईल’

पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आलियाला तिचे मनोगत व्यक्त करण्यास साग्न्यात आले होते. तेव्हा ती गंगूबाई स्टाईलमध्ये म्हणाली की, ‘मला भाषण देण्याची सवय नाही’. चित्रपट पाहिल्याबद्दल तिने प्रेक्षकांचे आभारही मानले.

‘गंगूबाई काठियावाडी’बद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलियासोबत अजय देवगण, शंतनू माहेश्वरी, विजय राज आणि इंदिरा तिवारी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …