Raj Thackeray : आवडता बायोपिक कोणता? राज ठाकरे उत्तर देत म्हणाले…

Raj Thackeray On Biopic : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नुकताच ‘अथांग’ (Athang) या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लॉंच झाला. ट्रेलर लॉंच दरम्यान मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. तेजस्विनीने राज ठाकरेंना प्रश्न विचारला,”तुमच्यावर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली तुम्हाला पाहायला आवडेल?

तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांना “तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एवढा ड्रामा आहे, त्यात राजकारण आहे, लव्हस्टोरी आणि आयुष्यातले इतर चढउतार आहेत तर मग तुमच्यावर जर बायोपिक निघाला तर तुमची भूमिका कोणी साकारलेली पाहायला तुम्हाला आवडेल?” असा प्रश्न विचारला. ज्यावर राज ठाकरे यांनी फारच मजेदार उत्तर दिलं. राज ठाकरे यांचं उत्तर ऐकल्यानंतर तेजस्विनीलाही हसू आवरेनासं झालं.

तेजस्विनीने पुढे विचारलं,”पण जर आम्हाला तुमचा बायोपिक करायचा झाला तर तुम्ही संधी द्याल का? यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले,”तसं काही असेल तर करा. माझी काहीच हरकत नाही. पण काही नसेल तर कशाला उगाच बनवायचं काही”. 

राज ठाकरे पुढे म्हणाले,”गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बायोपिक येत आहे. पण जर सर्वोत्कृष्ट बायोपिक कोणाचा होऊ शकत असेल तर तो इंधिरा गांधी यांचा आहे. कारण त्यांचा संपूर्ण प्रवास हा रोलरकोस्टर राइडसारखा आहे. बायोपिक करताना योग्य व्यक्तीची निवड होणं गरजेचं आहे. आतापर्यंत आलेल्या बायोपिकपैकी ‘गांधी’ हा मला वाटतं सर्वोत्कृष्ट बायोपिक आहे”.

हेही वाचा :  रितेश-सलमानच्या गाण्यावर थिरकला तंजानियाचा किली पॉल

Reels

‘अथांग’मध्ये कलाकारांची मांदियाळी

‘अथांग’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. निवेदिता जोशी सराफ, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, भाग्यश्री मिलिंद, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

मराठी सिनेमे, वेबसीरिज प्रेक्षकांपर्यंत का पोहोचत नाहीत यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले,”मला सिनेमा पाहायला आवडतं. पण मी तज्ज्ञ नाही. माझ्या घरामध्ये एक ड्रोबो नावाचं मशीन आहे. या ड्रोबो मशिनमध्ये साडेआठ ते पावणेनऊ हजार चित्रपट आहेत. हे सर्व सिनेमे मी पाहिले आहेत.”

संबंधित बातम्या

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ओटीटी सेन्सॉरशिपवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘शिव्या…’

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …