‘हर हर महादेव’ बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश

Har Har Mahadev: सध्या ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev)  या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आरोप सध्या अनेक नेते करत आहेत. ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) थेट ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. 

या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मत आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. 

दिग्दर्शक अभिजित देशपांडे भूमिका मांडणार
हर हर महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे आज चित्रपटाबाबत भूमिका मांडणार आहेत. आज 11 वाजता अभिजित देशपांडे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये अभिजित देशपांडे  कोणती मतं मांडतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा :  Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल

संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता आरोप
‘हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता. ते म्हणाले होते, ‘या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवाचं? सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत?’

  

‘हर हर महादेव’ या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 25 ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा ‘हर हर महादेव’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

ठाण्यात अभूतपूर्व राडा, हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून गोंधळ, राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …