‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढणार ?

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाच्या शो दरम्यान  काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये राडा झाला त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आला आहे. सायंकाळी सव्वा 6 वाजता हा शो ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल याच ठिकाणी हा शो बंद पाडला होता त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा शो परत सुरु केला.  आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मनसे हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवणार आहे. काल ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्याच्या कुटुंबाला आज पुन्हा एकदा हा शो पाहण्यासाठी आमंत्रण दिले असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. 

अविनाश जाधव यांचे ट्वीट 

काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यानंतर अविनाश जाधव यांनी ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये अविनाश जाधव यांनी लिहिलं, ‘‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेणारा चित्रपट बंद पाडणं हे कितपत योग्य? आक्षेप घेण्याईतका चित्रपट नसताना हा द्वेष का? नेहमीप्रमाणे राजकारणच का?’

राज ठाकरेंनी दिले मनसे प्रवक्त्यांना चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश 

हेही वाचा :  बहुप्रतिक्षित पठाण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून सुपरस्टार शाहरूख खानचं आज भारतात आगमन झालं

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्यानं काहीच न बोलण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मत आहे.  राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. 

दिग्दर्शक अभिजित देशपांडे भूमिका मांडणार हर हर महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे आज चित्रपटाबाबत भूमिका मांडणार आहेत. आज 11 वाजता अभिजित देशपांडे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये अभिजित देशपांडे कोणती मतं मांडतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अभिजित देशपांडे यांना पोलीस सुरक्षा देखील देण्यात आली आहे. देशपांडे यांच्यासोबत 24 तास एक पोलीस कर्मचारी असणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश; दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांची आज पत्रकार परिषद



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …