पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track!

Student Sucide: तुमचा मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ मोबाईल पाहते? टाइमपास म्हणून त्यांच्या हाती दिलेल्या मोबाईलच त्यांना व्यसन लागलंय का? ही छोटी वस्तू त्यांच्या आयुष्यावर परिणाम तर करत नाहीय ना? कारण उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून मोबाईल फोन एका मुलाच्या मृत्यूचे कारण बनला आहे. या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधली आणि क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात  नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अचानक ओढवलेल्या या प्रसंगगातून कुटुंबीय अद्याप सावरु शकले नाही. 

निखिल साहू असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कस्बाच्या सरकारी शाळेत पाचवी इयत्तेत शिकत होता. दुपारी 2 वाजता तो घरातील एका खोलीत पडून मोबाईल पाहत होता. यावेळी युट्यूबवर मिठातून विष बनवणे, मरण्याची सोपी पद्धत, फाशी लावून मृत्यूपासून वाचण्याचे रिल्स पाहत होता. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याने खोलीतील खुंटीला फास लावून तपासण्याचा प्रयत्न केला. पण फास आवळत गेला आणि त्यातच निखिलचा मृत्यू झाला. 

शेजारी गेलेली आई रुबी साहू घरी परतली आणि तिने मोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून परिसरातले सर्वजण गोळा झाले. मुलाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टर तरुण पाल यांनी त्याला मृत घोषित केले. 

हेही वाचा :  नवी मुंबई पालिकेत दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

निखिला हा हुशार विद्यार्थी होता. त्याला 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळायचे, असे त्याच्या शाळेतून सांगण्यात आले. पण निखिल अशा पद्धतीचे व्हिडीओ मोबाईलवर का पाहत असेल? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर त्याच्या घरच्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 

मुलांच्या मोबाईलवर ‘असे’ ठेवा लक्ष

सध्या अनेक मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. रिल्स बनवणे आणि पाहणे हे अनेकांच्या आवडीचे काम बनले आहे. अशावेळी गुगल फॅमिली लिंक अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही मुलांवर लक्ष ठेवू शकता. यासाठी, तुमच्या फोनवर प्ले स्टोअरवरुन गुगल फॅमिली अ‍ॅप इंस्टॉल करा. गेट स्टार्टेडवर क्लिक करा. यानंतर गुगल पर्याय निवडा, त्यानंतर खात्यातून पॅरेंट पर्याय निवडा. ज्यामध्ये ‘डू यू चाइल्ड युवर अकाउंट’ हा पर्याय दिसेल. ज्यामध्ये होय म्हणा. त्यानंतर सेटिंग्जमध्ये गुगलवर जा आणि पॅरेंटिंगवर क्लिक करा. यानंतर मुलाच्या फॅमिली लिंक चाइल्ड अ‍ॅण्ड टीनवर जा आणि ते ओपन करा. यानंतर पॅरेंट खात्यावर क्लिक करा. यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि ते उघडा. यानंतर टू स्टेप व्हेरिफिकेशन पूर्ण करा. 

यानंतर मुलाच्या डिव्हाइसमध्ये नंबर येईल. होय या पर्यायावर क्लिक करून डिव्हाइससह याची पुष्टी करा. नंतर खाते व्हेरिफाइड करा. यानंतर, आपल्या डिव्हाइसवर जा आणि गुगलवर जाऊन आपला नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर डिव्हाईसमध्ये डन हा पर्याय दिसेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण मुलाच्या फोनवर सर्व अ‍ॅक्ट्वीव्हिटी पाहू शकता. दिवसानुसार वेळ ठरवता येते. यातून युट्यूब लपवू शकता. एक प्रकारे, मुलाचा फोन तुमच्या सूचनांवर काम करेल.

हेही वाचा :  पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारची नवी योजना जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …